नाही करायचा चित्रपट मी शुटींग बंद करतो… सिद्धार्थ जाधव भडकला

मुंबई | दे धक्का हा चित्रपट प्रदर्शित झालेला असून सध्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच हवा सुरू आहे. अनेकांनी दे धक्का नंतर दे धक्का २ ला देखील मोठी पसंती दिली आहे. अशात या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वच कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. मुलाखती देत आहेत. तर याच चित्रपटाच्या शुटींग वेळी एक रंजक किस्सा घडला होता. यात दिग्दर्शक महेश मांजरेकर हे सिद्धार्थवर खूप भडकले होते. त्यामुळे त्यांनी मी शुटींग बंद करतो. असं म्हटलं होतं.

दे धक्का आणि दे धक्का २ या दोन्ही चित्रपटांमध्ये सिद्धार्थ जाधव नेहमीच माती खाताना दिसला आहे. मात्र चित्रपटाच्या शुटींगवेळी देखील असेच घडले होते. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाची संपूर्ण टीम आली होती. त्यावेळी मकरंद जाधव यांनी सांगितले की, ” आम्ही चित्रपटाच्या शूटिंग साठी लंडनला आलो होतो. त्यावेळी आमचा सीन रस्त्यावर होता. सेट रेडी झाला. महेश यांनी आवाज दिला अरे सिद्धता…. आणि सिद्ध्या गायब. तो तिथे नव्हताच. सर्व जण त्याची वाट पाहत होते. नंतर पळापळ आणि शोधाशोध सुरू झाली कारण त्याचा फोन देखील बंद होता.

त्यामुळे आमचे एक सहकारी राजू दादा त्याला शोधायला जवळच्या मॉलमध्ये गेले. तिथे त्यांना सिद्धार्थ आणि सक्षम शूज विकत घेतना दिसले. राजू दादा त्या दोघांना घेऊन परत आले. त्यावेळी सिद्धार्थ लगेच बागा रस्त्यावर टाकून महेश यांचे पाय धरू लागला. मात्र त्यावेळी महेश खूप चिढले होते. त्यांनी सिद्धार्थला खूप ओरडले. त्यावेळी ते म्हणाले की, मी शुटींग बंद करू का?….. बंद करतो शुटींग नको करायला चित्रपट….. या सगळ्यात शिवाजी साटम यांनी गुपचूप एक फोटो देखील काढला होता.

त्यात सिद्धार्थ खाली मान करून महेश मांजरेकर यांचा ओरडा खाताना दिसतो आहे. या सर्वांवर सिद्धार्थला प्रश्न विचारला त्यावेळी तो म्हणाला की, मला शूज खूप आवडतात. त्यावेळी शुटींग साठी बाकीची मंडळी यायची बाकी होती. त्यामुळे मी जवळच्या टी मॅक्समध्ये गेलो होतो.

मात्र मी राजू दादांना सांगितलं होतं की सगळे आल्यावर मला कॉल करा. पण फोन लागला नाही. त्यामुळे मी परत आलो तेव्हा लांबूनच पाहिलं महेश मांजरेकर भडकले आहेत. त्यामुळे मी बॅग रस्त्यावर टाकून त्यांचे पाय पकडले. ते मला थोडं ओरडले. हा सर्व किस्सा याच चित्रपटाच्या शुटींग वेळी थोडा लांबला असता तर कदाचित दे धक्का २ चित्रपट पाहायला चाहत्यांना आणखीन प्रतीक्षा करावी लागली असती.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *