मी माझा मृत्यू आणि देव एकाच वेळी पाहिला, प्रसिद्ध संगीतकाराच्या गाडीला भीषण अपघात

मुंबई | कोणतेही वाहन चालवताना ते सावकाश आणि काळजीपूर्वक चालवावे असे नेहमीच आपल्याला सांगितले जाते. त्याचबरोबर वाहतुकीचे नियम देखील सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. मात्र बऱ्याचदा आपण हे नियम पाळत असताना समोरील व्यक्ती हे नियम पाळत नाही आणि ज्याचा परिणाम आपल्याला भोगाव लागतो. असाच काहीसा प्रकार गायक जॉनी जोहान याच्याबरोबर घडला आहे.

गायक जॉनी जोहान हा आपल्या चार मित्रांबरोबर एका चार चाकी गाडीमधून फिरायला गेला होता. त्याचवेळी त्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये त्याची गाडी पूर्णपणे उलटी झाली होती. मात्र गाडी मधील कुणालाही जास्त दुखापत झाली नाही.

जॉनी जोहान यांनेसंगीत विश्वात मोठे नाव कमवले आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखो चाहते आहेत. मोहालीच्या सेक्टर 22 मध्ये त्याच्या चार चाकी गाडीला एका गाडीने मागून धडक दिली. त्यामुळे त्याची गाडी उलटी झाली. हा सर्व प्रकार मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडला. या संदर्भात कलाकाराने एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

या अपघाताविषयी त्याने सांगत म्हटले आहे की मी माझा मृत्यू आणि देव जवळून पाहिला. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अनेक चाहते देखील त्याची चिंता व्यक्त करत आहेत. तसेच त्याच्या आयुष्यात कोणतेही अडथळे येऊ नयेत अशी प्रार्थना करत आहेत.

सदर घटनेबद्दल सुहाना स्टेशन हाऊस ऑफिसर यांनी सांगितले आहे की, ” गाडीमध्ये जॉन आणि त्याचे अन्य तीन मित्र होते. हे सर्वजण सेक्टर 91 च्या दिशेने चालले होते. सेक्टर 88 जवळ पोहोचले असता त्यांच्या गाडीला अपघात झाला. दुसरे एक चार चाकी गाडी भरगाव वेगामध्ये आली आणि त्या गाडीने जॉनच्या गाडीला धडक दिली. गाडी उलटी झाली यावेळी तातडीने इतर व्यक्तींनी सर्वांना गाडीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने यातील कुणालाही जास्त दुखापत झालेली नाही”
जॉननेदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आम्ही सर्वजण ठीक आहोत काळजी करू नका असेच चाहताना सांगितले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *