‘मी तुला खूप मिस करते…’ अभिनेत्री अमृता खानविलकर वरती कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन

मुंबई | अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तिच्या चंद्रमुखी या चित्रपटातून अफाट प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र आता या अभिनेत्रीच्या आयुष्यात दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तिच्या आयुष्यातील एका जवळच्या व्यक्तीचे दुखद निधन झाल्याने ती खूप भाऊक आहे. चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्रीने अनेक ठिकाणी प्रमोशन केले. या चित्रपटाने सोशल मीडियावर फक्त तिचा आणि तिचाच गाजावाजा पाहायला मिळाला.

प्रत्येक ठिकाणी जाऊन तिने आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले. चंद्रमुखी या चित्रपटामधून लावणी सादर करत तिने तिच्या अदा आणि अभिनयाने अनेकांच्या काळजावर वार केले. अमृताने आतापर्यंत मराठी तसेच बॉलीवूड सिनेसृष्टीमध्ये देखील अभिनय केला आहे. आलिया भटच्या राजी या चित्रपटामध्ये अमृता खानविलकरने महत्वाची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयामुळे ती मोठ्या प्रसिद्ध झोतात आहे मात्र आता तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाल्याने तिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. अमृता खानविलकर स्वतःच्या आई पेक्षा तिच्या मावशीवर खुप प्रेम करायची. तिच्या याच मावशीचे आता निधन झाले आहे. त्यामुळे अभिनेत्री भाऊक झाली असून सोशल मीडियावर तिने मावशी बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ” आज मी तुला ज्या प्रकारे पाहिलं ते पाहून माझ्यातला एक भाग सुन्न झाला. माझ्या माऊशीपेक्षा तू माझ्यासाठी आईच होतीस. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जाताना आणि अजूनही खंबीरपणे उभी राहून तुला पाहण्यासाठी तुझ्या कुटुंबासाठी अशा गोष्टींमुळे मला स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली.”

पुढे आपल्या मावशीच्या आठवणींना उजाळा देत तिने लिहिले की, ” तुझ्या हातांनी आम्हाला खाऊ खायला घालण्यापासून मला आणि अदितीला आमच्या करिअरमध्ये मोठी झेप घेण्यापर्यंत तू नेहमीच आम्हाला साथ दिली. तू आमच्यासाठी जे काही केले आहेस त्यामुळे आम्हाला सदैव तुझी आठवण येईल. या जगात आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्ही तुझे ऋणी राहू. ”

तसेच यामध्ये मोठ्या धीराने अमृताने पुढे लिहिले आहे की, ” आता तू अगदी निश्चितपणे आणि शांत होऊन झोप. तुला हवी तेवढी आईस्क्रीम खा आणि मस्त मजेत रहा. इथली कसलीच काळजी करू नको आता आप्पा आणि आजी तुझी काळजी घेतील तू परत लहान होऊन त्यांच्याकडे जा.

आतापर्यंत तू माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जे काही केलं आहेस त्याची आम्ही कोणीच परतफेड करू शकत नाही. माऊ मी तुला खूप मिस करते. तू अगदी सावलीप्रमाणे मम्मी मी आणि आदिती आमच्या तिघींवर देखील छाया ठेवलीस. मला अजून तुला आणि मम्मीला खूप काही सांगायचं होतं मात्र माऊ आता तू तुझी काळजी घे….”

असे अमृत आणि तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक जण तिच्या दुःखात सामील होऊन तिला धीर देत आहेत. तसेच तिच्या मावशीच्या निधनावरती शोक व्यक्त करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *