‘उलटी येत आहे गाडी थांबवा…’ लग्न झाल्यावर सासरी जाताना नव वधू सोबत जे घडलं ते पाहून डोळ्यात पाणी येईल

नवी दिल्ली | गाजावाजात आणि थाटामाटात लग्न करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यामध्ये प्रत्येकच मुलीची खूप हौस मौज असते. नवनवीन दागिने घेणे सुंदर साडी नेसणे आणि डीजेच्या तालावर नाचणे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. असे स्वप्न पाहणाऱ्या एका मुलीने थाटामाटात लग्न केले.

लग्न करून ती तिच्या सासरी निघाली. वधूच्या घराकडून गाडी वराच्या घराकडे चालली होती. यावेळी गाडीमध्ये वधू वर आणि वराकडची काही मंडळी होती. यावेळी वधूने मला उलटी येत आहे गाडी थांबा असे सांगितले. त्यावेळी गाडीने सात किलोमीटर एवढे अंतर सुद्धा कापले नव्हते.

गाडी एका नदीच्या पुलाजवळ येऊन थांबली होती. नवविवाहित वधू गाडीतून खाली उतरली. नंतर तिने जे काही केलं ते पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. गरगरत आहे आणि उलटी येते आहे असे सांगून खाली उतरलेल्या त्या वधूने पुलावर चढून खाली पाण्यात उडी मारली.

या घटनेने सर्व वराडी हवालदील झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची खबर दिली. पोलीस देखील लगेचच घटनास्थळी दाखल झाले. गेल्या बारा तासापासून पोलीस या मुलीचा शोध घेत आहेत. मात्र अजून तिचा काहीच पत्ता लागलेला नाही.

यावेळी त्या मुलीच्या वडिलांना घटनेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, माझी मुलगी असं काही करेल याची मला काहीच कल्पना नव्हती. लग्नाच्या आदल्या दिवशी देखील ती हळदीच्या तालावर नाचत होती. त्यानंतर वरातीमध्ये देखील ती नवरदेवाबरोबर नाचत होती. तिने हे पाऊल का उचलले आहे याची आम्हाला काहीच माहिती नाही. सदर विवाह हा दोन्ही कुटुंबांच्या संमतीने झाला होता. मात्र मुलीने घेतलेला हा निर्णय दोन्ही कुटुंबांसाठी कायमच दुःखाचा किनारा बनवून राहील.

वराचे नाव दीपक माळी असून तो राजस्थान येथील सवाई माधोपुर येथे वधूच्या घरी आला होता. नवरीला पुन्हा आपल्या घरी घेऊन जात असताना चंबळ नदीच्या पुलावर सदर घटना घडली. या घटनेने वराडी आणि दोन्ही कुटुंबातील व्यक्ती या घटनेमुळे थक्क झाले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *