‘आई तुझ्याविना मी भिकारी’ आयपीएस IPS अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या आईचे निधन; भाऊक पोस्ट व्हायरल

मुंबई | स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी म्हटलं जातं ते आईच्या महतीमुळेच. मुलगा कितीही मोठया पदावर असला तरी तो आईसाठी मुलगाच असतो. आईची उणीव ही मुलांसाठी खूप मोठी पोकळी असते. अशीच पोकळी निर्माण झाली आहे आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या आयुष्यात. कृष्णप्रकाश यांना नुकताच मातृशोक झाला असून तुझ्याविना मी भिकारी झाला अशा शब्दात कृष्णप्रकाश यांनी आईसाठी भावूक पोस्ट सोशलमीडियावर शेअर केली आहे.

आयपीएस अधिकारी हे पोलिस खात्यातील एक लोकप्रिय व्यक्तीमत्व आहे. सोशलमीडियावर त्यांच्या प्रेरणादायी पोस्ट नेहमी चर्चेत असतात. कधी अनुभव शेअर करत तर कधी एखादी घटनेच्या अनुषंगाने जीवनाचा दृष्टीकोन सांगणाऱ्या त्यांच्या पोस्टना नेटकरी प्रतिसाद देत असतात. पण सध्या मात्र त्यांच्या सोशलमीडियावरची एक पोस्ट त्यांच्यासह अनेकांना भावुक करत आहे. कृष्णप्रकाश यांच्या आईचं निधन झाल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या जाण्याने दु:खी झालेल्या कृष्णप्रकाश यांनी भावुक पोस्ट करत आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आईसोबतचा एक फोटो कृष्ण प्रकाश यांनी शेअर केला आहे. या पोस्टसोबत त्यांनी असं लिहिलं आहे की, आई, तुझी गणपतीवर खूप श्रध्दा होती. कायम तुझ्याजवळ बाप्पांची मूर्ती असायची. तुझ्या आयुष्यातील शेवटच्या दिवसात नेहमी बाप्पांची मूर्ती जवळ ठेवलीस, आणि आता गणेशोत्सव येतोय, गणपतीचं आगमन होणार आहे अशा वेळी तू सोडून निघून गेलीस. हे सगळं मला अजिबात अपेक्षित नव्हतं. तू नाहीस तर मी काहीच नाही. माझी आई गेली . तुझ्याशिवाय मी आता भिकारी बनलो आहे.

आईचं निधन झालं आणि मी पोरका बनलो असंही कृष्ण प्रकाश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. , आई कायम आपल्यासोबत असते. जोपर्यंत ती जीवंत असते तोपर्यंत सोबत असते आणि तिच्या जाण्यानंतर ती आठवणीत कायम असते. जेव्हा आपण प्रिय व्यक्ती गमावतो तेव्हा आपल्याला स्वर्गात एक देवदूत मिळतो जो आईच्या रूपाने आपल्यावर लक्ष ठेवतो. मी माझ्या आईला गमावल्याचं दु:ख शब्दात सांगू शकत नाही.

कृष्ण प्रकाश असंही म्हणतात की, मी माझ्या आईची बरोबरी कधीच करू शकणार नाही. या काळात मला सांत्वनाचे खूप फोन आले. सगळ्यांनी दिलेला आधार मला मोलाचा आहे. पण आई माझ्यासोबत नाही यावर माझा विश्वासच बसेनासा झाला आहे. तिच्यासाठी प्रार्थना करा आणि या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो अशीही प्रार्थना करा असं म्हणत कृष्ण प्रकाश यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *