ऋतिक रोशनची बहिण पाहिली का? दिसते खूपच सुंदर लवकरच करणार बॉलिवुडमध्ये पदार्पण

मुंबई | रोशन कुटुंबीयांचा मनोरंजन विश्वात एक वेगळाच वारसा आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य दिसायला फार सुंदर आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःचं नाव कमवत आहे. राकेश रोशन यांनी सुरुवातीला अभिनय क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र अभिनयामध्ये त्यांना फारसं यश मिळाले नाही.

त्यामुळे नंतर त्यांनी दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली. सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील टॉप दिग्दर्शकांपैकी ते एक आहेत. राकेश रोशन यांनी बॉलीवूडला अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट दिलेत. त्यांचे सर्व चित्रपट तिकीट बारीवर मोठे हे ठरले आहेत. राकेश रोशन यांनी खून भारी मांग, कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिश, किशन कन्हैय्या, करन अर्जुन, कोयला या सारखे सुपरहिट सिनेमा बनवले आहेत.

अशाच राकेश रोशन यांना एक भाऊ देखील आहे. त्यांच्या भावाचे नाव राजेश रोशन असे आहे. राजेश रोशन देखील मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. मात्र अभिनय किंवा दिग्दर्शन नाही तर त्यांनी आपल्या कारकिर्दीसाठी संगीत क्षेत्राची निवड केली आहे. आपल्या सुमधुर गाण्यांनी चाहत्यांना भुरळ घालत असतात. ज्युली आणि स्वामी या चित्रपटांसाठी राजेश रोशन यांनी फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीतकाराच्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.

अशात कौटुंबिक वारसा जपत राकेश रोशन यांचा मुलगा ऋतिक रोशन हा बॉलीवूड मध्ये चांगलीच धूम करत आहे. त्याच्या अभिनयाचा डंका हा फक्त बॉलीवूड नाहीतर हॉलीवुड पर्यंत देखील पोहोचलेला आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल आहे. राकेश रोशन दिग्दर्शित कहोना प्यार है हा ऋतिकचा पहिला चित्रपट होता. यामध्ये अमिषा पटेल या अभिनेत्रीने त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. स्टार किड असलेला ऋतिकचा हा पहिलाच चित्रपट खूप गाजला होता.

बॉलीवूडमधील रोशन कुटुंबीय बॉलीवूड चांगलं गाजवत आहेत. कदाचित तुम्हाला माहित नसेल पण ऋतिक रोशनला एक बहीण देखील आहे. पशमिना रोशन ही राजेश रोशन यांची मुलगी आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिला देखील आता अभिनय क्षेत्रात नाव कमवायचे आहे. यासाठी तिने आता मोठी तयारी देखील सुरू केली आहे.

रोशन कुटुंबीयातील आगामी ही अभिनेत्री दिसायला फारच सुंदर आहे. बॅरी जॉन इन्स्टिट्यूट मधून तिने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. यामुळे तिने काही इंग्रजी नाटकांमध्ये देखील काम केले आहे. सध्या ती नदिरा बब्बर यांच्याकडून अभिनय शिकत आहे. ती सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडिया वरती चर्चा वर्ग फार मोठा आहे. आपल्या हॉट आणि बोल्ड लुकने ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. अशात आता ऋतिकची बहीण देखील लवकरच बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *