हृतिक रोशनची एक्स पत्नी लवकरच करणार दुसरं लग्न….

मुंबई | हृतिक रोशन सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याच्या चर्चेचे कारण तो नसून त्याच्या आयुष्यात येऊन गेलेली एक व्यक्ती आहे. हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खान मुळे हृतीकची चर्चा होतं आहे. याचं कारण म्हणजे सुझैन लवकरच तिच्या बॉयफ्रेंड बरोबर लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.

अर्सलन गोनीसोबत सुझैन गेल्या काही वर्षांपासून डेट करत आहे. हृतिकला घटस्फोट दिला असला तरी ती दोन मुलींची आई आहे. मात्र ती आपले हृदय अर्सलनला देऊन बसली आहे. अनेक वेळा या दोघांना एकत्र स्पॉट केलं आहे. अनेक पार्टीमध्ये हे कपल एकत्र येतात. तसेच दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात.

सुझैन नेहमीच सोशल मीडियावर अर्सलन बरोबरचे सुंदर आणि रोमँटिक फोटो शेअर करत असते. या दोघांनी आता एकत्र राहण्याचा आणि लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. तिचं असं म्हणणं आहे की, आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो. आम्हाला एकत्र संपूर्ण जीवन जगायचे आहे. त्यासाठी आम्ही लग्न केले पाहिजे असे मला वाटते.

आता सुझैनचे हे दुसरे लग्न आहे. यात विशेष म्हणजे हृतिकने तिला तिच्या नवीन आयुष्यासाठी खूप सपोर्ट केला आहे. तिने दुसरे लग्न करावे यासाठी तो नेहमीच तिच्या बरोबर राहणार आहे. कायम तिची साथ देणार आहे. हृतिक आणि सुझैन हे दोन मुलांचे आई वडील आहेत.

आपल्या मुलांच्या बाबतीत दोघेही खूप जागरूक आहेत. त्यामुळे ते अनेक वेळा आपल्या मुलांसाठी एकत्र वेळ घालवत असतात. सुझैनचे हे लग्न येत्या काही दिवसांत संपन्न होईल. हे लग्न फार गाजावाजा न करता कमी व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप या कपलने त्यांच्या लग्नाची कोणतीच घोषणा केलेली नाही.

साल २००० मध्ये हृतिकने सुझैन बरोबर लग्न केले होते. त्यानंतर या दोघांनी १२ वर्षे एकत्र सुखी संसार केला. सुझैन नेहमीच हृतिकच्या पाठीशी उभी राहिली आहे. तिने कंगना रणावतच्या केसमध्ये देखील हृतिकला पाठिंबा दिला होता. त्यामुळेच आता तो तिच्या दुसऱ्या लग्नाला तिला सपोर्ट करत आहे. या दोघांना रेहान आणि रिदान नावाची दोन मुलं आहेत. दोघेही आपल्या मुलांसाठी खूप वेळ एकत्र घालवतात.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *