हृतिक रोशन लवकरच करणार लग्न; पाहा होणारी बायको

दिल्ली | हृतिक रोशन आणि सबा आझाद हे सध्या बॉलीवूडचे सर्वात लोकप्रिय कपल ठरत आहेत. जेव्हापासून या दोघांना मुंबईच्या एका भोजनालयाबाहेर, हातात हात घालून पाहिले, तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहेत. सबा हृतिकच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना देखील दिसली आहे. तसेच हृतिकच्या घरून तिला नेहमी जेवण जात असलेलं दिसल आहे. या वारंवार कौटुंबिक भेटींचा अर्थ असा लावला जात आहे की, ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे का?

• हृतिक रोशन-सबा आझाद लवकरच लग्न करणार?
बेजान दारूवाला आता या जगात नाहीत, पण त्यांचे अनेक मोठे भाकीत खरे ठरले आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा हृतिक रोशन आणि सुजैन खान वेगळे झाले होते, तेव्हा बेजान दारूवाला यांनी अभिनेत्याच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बेजान दारूवाला यांनी एका पत्रकाराला सांगितले होते की, हृतिकचे दुसरे लग्नही नशीबात आहे. हृतिक आणि सबा हल्ली ज्याप्रकारे जवळ येत आहेत, त्यावरून प्रश्न पडतो की हृतिक सबासोबत दुसरे लग्न करणार का?

हृतिक आणि सबा एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे, मात्र अधिकृतपणे दोघांनीही यावर काहीही बोललेले नाही. विशेष म्हणजे, काही काळापासून हृतिक रोशनचे नाव गायक-अभिनेता सबा आझादसोबत जोडले जात आहे. हृतिक आणि सबा अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत, तर सोशल मीडियावर दोघेही एकमेकांच्या फोटो आणि व्हिडिओवर कमेंट करत राहतात.

यासोबतच हृतिकच्या कुटुंबातील अनेकांनीही सबावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सबाने हृतिकच्या घरी खासगी कार्यक्रमही केले आहेत. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आहेत पण लग्नाची घाई करू इच्छित नाही असं देखील म्हटल जात आहे.

हृतिक रोशन आणि सबा आझाद सोशल मीडियावर चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही दोघे अनेकदा चर्चेत आले आहेत. हृतिकने बर्‍याच वेळा त्याच्या इन्स्टा स्टोरीवर सबाशी संबंधित काहीतरी शेअर केले आहे, तर दोघेही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत राहतात. याशिवाय दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल झालेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *