दुर्दैव तरी किती असावं! या कारणास्तव आईने आपल्या मुलाचा मृतदेह नेला खांद्यावर उचलून…

नवी दिल्ली | उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथे माणुसकीला काळींबा फासणारी घटना घडली आहे. या घटनेनं तुमच्या देखील डोक्यात राग जाईल. रुग्ण वाहिका वेळेवर न पोहचणे हे तर आता पर्यंत आपण अनेकदा ऐकले असेल. वेळ निघून गेल्याने अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र आता याहूनही खालच्या पातळीची घटना घडली आहे. एका आईला आपल्या बाळाचा मृत देह शव वहिका नसल्याने खांद्यावर उचलून न्यावा लागला आहे.

कुशीनगरच्या तमकुहीराज येथे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. या ठिकाणी राहणाऱ्या वहाब अन्सारी यांचा मुलगा खेळता खेळता एका विजेच्या तारे जवळ गेला. तिथे त्याला विजेचा जोरात शॉक बसला. त्यामुळे तो जागीच निपाचींत पडला. त्यामुळे त्याच्या आईने त्याला जवळील शासकीय रुग्णालयात नेले. आपल्याला बाळाला वाचवण्यासाठी तिने खूप धडपड केली. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत देह रुग्णालयातून बाहेर आणला. बाकीच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला याला घरी घेऊन जा असे सांगितले.

यावेळी या आईने आपला मोलाचा दागिना गमावला होता. ती खूप दुःखात होती. मात्र तिच्या बाळाचा मृत देह घरी घेऊन जाण्यासाठी तिथे शव वाहीका आणि रुग्ण वाहिक देखील उपलब्ध नव्हती. महिला बराच वेळ आपल्या बाळाचे शव खांद्यावर घेऊन उभी राहिली. मात्र तरी देखील तिला शव वहीका मिळाली नाही. त्यानंतर गावातील एक व्यक्ती दुचाकी घेऊन आला आणि त्या आईने आपल्या बाळाला खांद्यावर घेऊन दुचाकीने त्याचे शव घरी नेले.

या घटनेने पुन्हा एकदा शासकीय भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. गावातील सर्व व्यक्ती या चिमुकल्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करत आहेत. त्याच्या आईवर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *