विरारमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीचा झाला भयावह मृत्यू, संपूर्ण विरार शहरावर दुःखाची छाया….

विरार | दोन थेंब पाऊस पडला नाही की एमएससीबी वाले लगेचच लाईट घालवतात. यावेळी वेगवेगळी कारणे देत काम सुरू आहे असे सांगत तासंतास वीज पुरवठा खंडित राहतो. सध्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. अशात अनेक ठिकाणी विजेचे डीपी बॉक्स उघडे पडले आहेत. त्याचबरोबर विजेच्या तारा काही ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या आहेत. रस्ते देखील चांगले नाहीत रस्त्यांवर देखील खड्डे आहेत. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचते. या सर्व गोष्टींमुळे विरारमध्ये एक भयंकर दुर्घटना घडली आहे.

विरार मधील एका अल्पवयीन मुलीचा बळी गेला आहे. क्लास मधून घरी येत असताना घराच्या अगदी जवळ आल्यावर या मुलीला विजेचा जोरात झटका लागला. यात या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या मुलीच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश व्यक्त केला आहे.

तनिष्का लक्ष्मण कांबळे (वय १५ वर्षे) ही मुलगी इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. घरामधून ती क्लासला जायला निघाली होती. क्लासमध्ये जाऊन पुन्हा एकदा घरी परतत असताना घराजवळच तिला मृत्यूने कवटाळले. विरार पश्चिम येथील कृष्णा मथुरा नगरमध्ये एब्रोला सोसायटीत ही मुलगी राहत होती. कृष्णा मथुरा नगर परिसरामध्येच तिचा क्लास होता.

क्लास मधून घरी येताना तिच्याबरोबर असे काही घडेल याची कुणालाच कल्पना नव्हती. सदर घटनेबाबत एमएससीबीला जबाबदार ठरवले जात आहे. एमएससीबीच्या निष्काळजीपणामुळे तनिष्काचा जीव गेला असे सर्वजण म्हणत आहेत. घरी परतत असताना घराजवळच्या एका रस्त्यावर पावसामुळे थोडेसे पाणी साठले होते. याचवेळी रस्त्याखाली असलेल्या विजेच्या वायरीला ब्रेक गेला होता. वायर थोडीशी तुटली असल्याने त्यामधून विद्युत प्रवाह पाण्यामध्ये उतरला.

रस्त्यावरच्या या पाण्यामध्ये विद्युत प्रवाह असेल याची तिला काहीच कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे ती त्या रस्त्यावरून घरी येत होती त्यावेळी करंट असलेल्या त्या पाण्यात तिचा पाय पडला त्याचवेळी तिच्या संपूर्ण शरीर भर करंट पसरला. तिला पाहून तिच्या घरच्यांनी आणि आजूबाजूच्या व्यक्तींनी तिथे धाव घेतली. त्या करंटमधून तिला सोडवण्यात आले मात्र तोपर्यंत तिचा जीव गेला होता.

सदर घटना तनिष्का जिथे राहते तिथेच घडली त्यामुळे त्या संपूर्ण परिसरात दुःखाची मोठी लाट उसळली आहे. तसेच परिसरातील सर्व व्यक्ती यासाठी एमएससीबीला दोषी ठरवत आहेत. सदर घटनेची पोलिसांमध्ये देखील तक्रार नोंदवण्यात आली आहे. एमएससीबीच्या निष्काळजीपणामुळे बळी गेलेली तनिष्का ही पहिली मुलगी नाही. या आजही बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवरती एमएसीबीच्या वायरी पडलेल्या दिसतात. मात्र कर्मचारी याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. त्यामुळे नाहक निष्पापाचा यामध्ये जीव जातो. या आधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत.

तनिष्का इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. परीक्षा पास करून आयुष्यात काहीतरी मोठे व्हायचे तिचे स्वप्न होते. मात्र तिची सर्व स्वप्न एका क्षणात पुसली गेली आहेत. या घटनेमुळे तिच्या वर्गातील मित्र मैत्रिणी देखील खूप दुःखी आहेत. विरार शहरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तनिष्काचा बळी गेल्यानंतर आता तरी प्रशासनाला जाग येणार का असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *