हॉलिवूड हादरलं! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; जगात शोककळा

मुंबई | हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘स्टार ट्रेक’ फेम निर्माती निकोल निकोल्स यांचे निधन झाले आहे. त्या ८९ वर्षांच्या होत्या. नैसर्गिक मृत्यूने त्या आपल्यापासून दूर गेल्या आहेत. निकेल यांच्या जाण्याने इंडस्ट्री खूप भावूक झाली आहे. तसेच त्यांच्या मुलाने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

त्यांच्या मुलाने आईच्या निधनाची माहिती दिली आहे. कील जॉन्सनने आई निकेल निकोल्सच्या सोशल मीडिया हँडलवरून आणखीन एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “मी आणि माझे संपूर्ण कुटुंब तुमच्या दुःखात सामील आहोत. सध्या आम्ही खूप भावनिक आहोत आणि आम्ही या संदर्भात जास्त बोलू शकणार नाही. त्यामुळे आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर करा.”

आपल्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना कील जॉन्सनने लिहिले की, “मित्रांनो, चाहते, सहकारी आणि जगाला ही माहिती देताना खूप दुःख होत आहे. काल रात्री या जगाला तिच्या प्रकाशाने भरून टाकणारी माझी आई आता आमच्यात नाही. नैसर्गिक कारणाने तिचा मृत्यू झाला.”

1966-69 मध्ये ‘लेफ्टनंट उहुरा’ या मालिकेतील त्यांच्या भूमिकेने निकोल्स यांना ट्रेकर्स आणि ट्रेकीज या नावाने ओळखले जाऊ लागले. कृष्णवर्णीय स्त्रियांना नोकर म्हणून काम करण्यापुरते मर्यादित असलेले रूढीवादी विचार मोडून काढल्याबद्दल आणि सह-स्टार विल्यम शॅटनर यांच्यासोबत आंतरजातीय ऑनस्क्रीन चुंबनासाठी त्या विशेष चर्चेत आल्या होत्या.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *