हिंदी मालिकेतील या अभिनेत्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला; जाणून धक्काच बसेल

मुंबई | टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘खिचडी’ फेम अभिनेता पुनीत तलरेजाला मारहाण झाल्याची माहिती समोर आली. ठाण्यातील दोन व्यक्तींनी ही मारहाण केल्याचं म्हटलं जातयं. खुद्द पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितलं की, रविवारी रात्री 34 वर्षीय पुनीत तलरेजा स्कूटरवरून घरी परतत होता. तो आईचं औषध घेण्यासाठी गेला होता. अंबरनाथ परिसरात पोहोचताच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. अभिनेत्याला मारहाण केल्यानंतर अनोळखी व्यक्तींनी तिथून पळ काढला.

पूनितवर आरोपींनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. एवढंच नाही तर इतर धारदार शस्त्रांनीही त्याच्यावर वार केले. यानंतर पुनीतने जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला आणि त्याची स्कूटरही तिथेच सोडली. याबाबत अभिनेत्याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या सर्व गोष्टी त्याने तिथे लेखी स्वरूपात दिल्या होत्या.

दरम्यान, या घडलेल्या प्रकरणी अंबरनाथमधील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळावर पुनीत जबर जखमी झाल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी सध्या तपास सुरु असून पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. पुनीत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने खिचडी या गाजलेल्या मालिकेत काम केलं आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *