हेमामालिनी यांची भाची दिसते खुप सुंदर; करते हे काम

मुंबई | बॉलिवुडची ड्रीमगर्ल म्हणून आजही मेहामालिनी यांना ओळखले जाते. सध्या त्या चित्रपटांमध्ये सक्रिय नाहीत. मात्र त्यांच्या काळात त्यांनी केलेले चित्रपट चाहते आजही आवडीने पाहतात. हेमा मालिनी यांनी बॉलीवूड वरती बराच काळ राज्य केलं. अभिनयासह त्या उत्तम डान्स देखील करायच्या. तसेच पुढे त्यांनी राजकीय वर्तुळामध्ये देखील स्वतःचं नशीब आजमावलं. सपनो का सौदागर हा त्यांचा प्रथम चित्रपट होता.

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी लाखोंचा चहा हातावर पहिल्याच चित्रपटात मिळवला होता. पण तुम्हाला माहित आहे का हेमा मालिनी यांना एक भाची आहे. ज्याचं नाव मधू असं आहे. मधुने देखील बॉलीवूड गाजवल आहे. मात्र तिच्याबद्दल जास्त कुणाला माहिती नाही. त्यामुळे या बातमीमधून हेमामालिनी यांची भाची मधु हिच्या विषयी अधिक जाणून घेणार आहोत.

हेमा मालिनी यांचा भाऊ रघुनाथ याची मुलगी ही मधू आहे. मधुचे पूर्ण नाव मधुबाला असे आहे. सिने जगतात पाऊल ठेवताना तिने आपलं नाव बदलून मधु असं लिहिलं. अजय देवगन अभिनेता फुल और काटे या चित्रपटातून मधुने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या पहिल्या चित्रपटामधून मधूला विशेष पसंती मिळाली होती. तिचा अभिनय दांडगा असल्याने ती लवकरच लाईमलाईटमध्ये आली. मात्र बॉलिवूडच्या झगमगीत ती फार काळ टिकली नाही. खूप लवकरच तिची कारकीर्द संपली.

नंतर पुढे तिने लग्न केले. जुही चावलाचे पती जय मेहता यांचा चुलत भाऊ हा मधूचा पती आहे. आनंद शाह असं तिच्या पतीचे नाव आहे. साल १९९९ मध्ये या दोघांनी लग्न केले होते. मधुला दोन मुली देखील आहेत. अमेया आणि किया अशी तिच्या दोन्ही मुलींची नाव आहेत. तिच्या परतीला एकदा एका व्यवसायात खूप नुकसान झाले होते. त्यावेळी त्याने आपले घर १०० कोटींना विकून एक साधं घर खरेदी केलं होतं.

मधु ही हेमामालिनी यांची भाची असून देखील तिला बॉलीवूडमध्ये याचा अजिबात फायदा झाला नाही. चित्रपटांमध्ये तिच्याबरोबर गैरवर्तन केले जात होते. एकदा तर चार दिवस शूटिंग करून नंतर तिला त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले.

त्यानंतर तिच्या जागी दुसऱ्या एका अभिनेत्रीला तिथे काम दिले गेले. असा सर्व संघर्ष मधूने देखील तिच्या आयुष्यात केला. मात्र मधू आजही दिसायला खूप सुंदर आहे. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. आपल्या चाहत्यांना आयुष्यातील अनेक वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडिया मार्फत सांगत असते.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *