तो र’क्ता’च्या थारोळ्यात पडला होता, अन् लोक फक्त मोबाईल मध्ये व्हिडिओ काढत होते; घटना वाचून डोळ्यात पाणी येईल

दिल्ली | माणुसकीला काळिंबा फासणारी एक घटना समोर आली आहे. भर दिवसा एका तरुणाची चाकू भोसकून हत्या केली गेली आहे. २५ वर्षीय एका युवकाला रस्त्याच्या मधोमध मार्केट परिसरात चार ते पाच जणांनी मिळून संपवले. यावेळी तिथे खूप गर्दी होती. मात्र कुणीच पुढे येऊन त्या मुलाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. सर्व व्यक्तींनी बग्याची भूमिका घेतली.

आपल्या आजूबाजूला रस्त्यावर अनेक ठिकाणी मारहाण, भांडणे असे प्रकार घडत असतात. मात्र यावेळी अनेक व्यक्ती फक्त झालेला प्रकार बघत बसतात. खरं तर यावेळी गुन्हा करणाऱ्या व्यक्तींपेक्षा रस्त्यावर उभा असलेला जमाव मोठा असतो. त्यामुळे काही करून हा जमाव त्या व्यक्तींना रोखू शकतो. मात्र हे धाडस आता कुणीच दाखवत नाही.

मृत तरुण मयंक ( २५) याची चार ते पाच जणांनी मुळीन चाकूने वार करत हत्या केली. हा प्रकार इतका भयावह होता की, तुमच्याही अंगावर काटा उभा राहील. सदर घटनेचे फुटेज सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सदर युवक हा हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी होता.

ही घटना ११ ऑगस्ट रोजी घडली. सुरुवतीला मयंक आणि त्याचे मित्र दिल्ली येथील मालवीय नगर परिसरात बेगमपूर येथे बसले होते. त्यावेळी मयंक आणि त्याच्या मित्रांची ४ ते ५ व्यक्तींबरोबर भांडणे झाली. यावेळी त्याने आणि त्याच्या मित्राने समोरील ४ ते ५ व्यक्तींवर दगड फेक केली आणि तिथून पळ काढला. मात्र सदर आरोपी मयंक आणि त्याच्या मित्राचा शोध घेत होते. त्याच परिसरातील DDA भागात त्यांना मयंक दिसला. मग ते आरोपी मयंकवर चाकूने वार करून पळून गेले.

सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास स्पष्ट समजते की, मयंकची किती निर्घृण हत्या केली आहे. यावेळी तिथे खूप गर्दी होती मात्र त्याला वाचवण्यासाठी कुणीच पुढे आले नाही. थोड्यावेळाने त्याचा मित्र तिथे आला त्याने बाकीच्या लोकांच्या मदतीने मयंकला रक्ताच्या थारोळ्यातून उचलले आणि AIIMS रुग्णालयात दाखल केले. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनेची नोंद केली आहे. मात्र अजूनही मारेकरी फरार आहेत.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *