आला होता हनिमूनला मात्र आता आहे जेलमध्ये; हनिमूनच्या रात्री तरुणाच्या सोबत जे घडलं ते पाहून धक्काच बसेल

नवी दिल्ली | लग्न झाल्यावर आपल्या पत्नी बरोबर तो तरुण हनिमूनला गेला होता. इथे आल्यावर त्याने मोठी चूक केली. त्याची ही चूक आता त्याला तुरुंगात घेऊन आली आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे कदाचित त्याची पत्नी देखील त्याला घटस्फोट देईल अशी चिन्हे यात दिसत आहेत. झालेला प्रकार हा फार निंदनीय आहे.

एक ३४ वर्षांचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात सापडला आणि रंगे हात पकडला गेला आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे आता त्याला देखील स्वतःची लाज वाटत असावी. हनिमूनला गेला असताना त्याने फोनवर अल्पवयीन सेक्स वर्करची जाहिरात पाहिली. त्यानंतर आपल्या पत्नीला रूममध्ये झोपवून हा तरुण दिलेल्या पत्त्यावर पोहचला. तिथे सेक्स वर्कर नाही मात्र पोलीस मामा त्याला भेटले आणि पोलिसांनी त्याला जेल बंद केले आहे.

सेक्स क्राइम थांवण्यासाठी हिल्सबोरो काउंटी शेरिफ कार्यालयातून एक सापळा रचला जात आहे. यात आता पर्यंत १७६ जणांना अटक केली आहे. यामध्ये अंडर कव्हर डीटेक्टिव एक जाहिरात देत आहेत. यात सेक्सवर्कर अल्पवयीन मुली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही जाहिरात वाचून इथे येणाऱ्या सर्व व्यक्तींना पोलीस अटक करत आहेत.

यामध्ये नुकतेच लग्न झालेला हा तरुण देखील रंगे हाथ पकडला गेला आहे. विशेष म्हणजे तो स्वतःच्या हनिमून साठी आलेला असताना देखील त्याने हे कृत केलं आहे. त्यामुळे सगळीकडे याची चर्चा सुरू आहे. अनेक व्यक्ती अल्पवयीन मुलीवर अशा पद्धतीने अत्याचार करतात. त्यांना शोधून काढण्यासाठीच पोलिसांनी हा सापळा रचला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *