“त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी मला ठरवून फसवलं…..” अविष्कारच्या दुसऱ्या पत्नीचे गंभीर आरोप

पुणे | बिग बॉस मराठी सीजन 3 फेम आविष्कार दारव्हेकर हा त्याच्या अभिनय क्षेत्रातील कामांपेक्षा त्याच्या पर्सनल लाईफ मुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. नुकतेच त्याचे दुसऱ्यांदा लग्न झाले. आपल्या वाढदिवसाचे अवचीत्य साधत त्याने आपल्या पत्नीबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडिया वरती शेअर केले होते.

त्याचे फोटो पाहून सर्वच चाहते आनंदी झाले. अभिनेत्री स्नेहा वाघ बरोबर घटस्फोट घेतल्यानंतर ही त्याची दुसरी पत्नी आहे असे सर्वांना वाटत होते. मात्र त्यानंतर एका मोठ्या सत्याचा खुलासा झाला. यामध्ये आविष्कारची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत आहे.

अविष्कारने अभिनेत्री स्नेहा वाघ बरोबर पहिला विवाह केला होता. यावेळेस नेहा फक्त 19 वर्षांची होती. बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा हे दोघे आमने सामने आले होते. त्यावेळी या दोघांचे पुन्हा एकदा पॅचअप होईल असे सर्वांना वाटत होते. मात्र तसे अजिबात झाले नाही. बिग बॉसच्या घरात स्नेहा अविष्कार कडे पाहत देखील नव्हती. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, ” अविष्कार बरोबर माझे खूप लहान वयात लग्न झाले. त्यावेळी मी काटा रुते कुणाला या मालिकेमध्ये अभिनय करत होते.

तो मला नेहमी मारहाण करायचा. माझ्या चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा असायच्या. त्यावेळी मालिकेच्या संपूर्ण टीमने मला खूप सहकार्य केले. मी कशीबशी त्याच्या घरातून पळून आले त्यानंतर आमचा घटस्फोट झाला. मी आयुष्यात पुन्हा कधीच त्याच्याकडे जाणार नाही.” असे तिने सांगितले होते.

स्नेहा वाघ ही तिच्या अभिनय क्षेत्रात वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. अविष्कार मात्र सिनेसृष्टीमध्ये फारसा झळकताना दिसत नाही. अशात आता त्याच्या दुसऱ्या लग्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. ज्यावेळी त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीबरोबर फोटो शेअर केले त्यावेळी चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

मात्र त्यानंतर एक धक्कादायक सत्य समोर आले. अविष्कारने दुसऱ्यांदा नाही तर तिसऱ्यांदा लग्न केले आहे. स्नेहा वाघला घटस्फोट दिल्यानंतर देखील त्याने एक लग्न केले होते. त्याला एक लहान मुलगा देखील आहे. आपल्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट न देताच त्याने तिसऱ्या मुली बरोबर लग्न केले आहे.

या प्रकारामुळे सोशल मीडियावर त्याच्यावरती टीका होत आहे. अविष्कार आणि त्याच्या तिसऱ्या पत्नीचे फोटो पाहून त्याची दुसरी पत्नी स्मिता सावंत हिने सोशल मीडिया वरती एक मोठी पोस्ट लिहिली. त्याचबरोबर तिने अविष्कार बरोबर लग्न झाल्याचे फोटो देखील शेअर केले.

तसेच त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करत असताना काढलेला फोटो देखील तिने शेअर केला. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ” अविष्कारने मला खूप मोठा धोका दिला आहे. त्याने मला फसवून त्या मुलीबरोबर लग्न केले आहे. अविष्कार आणि त्याच्या कुटुंबीयांनी माझी खूप मोठी फसवणूक केली आहे.

त्यांनी माझ्या नावावरती खूप मोठे कर्ज करून ठेवले आहे. त्यांच्याकडचे पैसे संपल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पैसे मागायला सुरुवात केली. माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबीयांकडून त्यांनी भरपूर पैसे लुटले. त्यानंतर माझ्या नावावरती त्याने अनेक कर्ज देखील काढले. ”

आपल्या पोस्टमध्ये स्मिताने पुढे लिहिले आहे की, ” माझा आणि अविष्कारचा अजूनही घटस्फोट झालेला नाही. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी आणि त्याने गुपचूप घरामध्येच त्या मुलीबरोबर लग्न केले. मी त्या मुलीच्या घरी देखील जाऊन आले होते. त्यांना मी सर्व काही सांगितले होते. मात्र तरी देखील त्यांनी घरामध्ये गपचूप पद्धतीने लग्न केले.

आम्हा दोघांना एक ५ वर्षांचा मुलगा देखील आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर मी पुन्हा एकदा त्यांना जाब विचारायला गेले. त्यावेळी ती मुलगी माझ्यावरच उलट सुलट ओरडू लागली. तसेच ती माझ्या अंगावर धावून देखील आली.” हे सर्व काही स्मिताने तिच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. त्यामुळे अविष्कारचे हे प्रकरण सध्या खूप मोठे चर्चेत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *