हॉटनेसचा कहर! मोहनीश बहलची मुलगी आणि नूतनच्या नातीचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल

मुंबई | बॉलीवूडमध्ये असे अनेक घराणे आहेत जिथे पिढ्यानपिढ्या अभिनयात सक्रिय आहेत. मोहनीश बहल हा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. अनेक चित्रपटांमध्ये तो उत्कृष्ट भूमिका साकारताना दिसला आहे. मोहनीश बहलची मुलगी आणि नूतनची नात प्रनूतन बहल ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. अशात स्टार कीड असूनही प्रनूतन आत्तापर्यंत ‘हेल्मेट’ आणि ‘नोटबुक’ या दोनच चित्रपटांमध्ये दिसली आहे. मात्र अल्पावधीतच ती इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.

मोहनीश बहलची मुलगी आणि नूतनची नात प्रनूतन दिसायला खूप सुंदर आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांशी संवाद साधते. आता पुन्हा एकदा ती तिच्या काही लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे. प्रनूतन बहलचे इन्स्टा प्रोफाइल तिच्या सुंदर फोटोंनी भरलेले असले तरी तीन दिवसांपूर्वी तिने स्वतःचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला होता, जो सध्या चर्चेत आहे. या फोटोतील प्रनूतनचे अतुलनीय सौंदर्य पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या फोटोमध्ये तिने अनोख्या अंदाजात पोज दिल्या आहेत.

तिच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून अनेक जण तिच्यावर फिदा झाले आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी तुफान लाइक्सचा वर्षाव केला आहे. या फोटोतील तिची सुंदरता पाहून अनेक जण घायाळ झाले आहेत. तिला यासाठी अनेक कमेंट येत आहेत. फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “किती सुंदर फोटो आहे”. तर दुसर्‍याने लिहिले की, “तुझ्या हसण्यावर मी माझे हृदय हरवून बसलो”. तर दुसर्‍याने कायनातला प्रनूतनसमोर अपयशी म्हटले आहे. आपल्या हॉटनेसने कहर करणारी ही स्टार कीड तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.

 

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *