सोनपरीचां मुलगा दिसतो खुप सुंदर; करतो हे काम

मुंबई | साल २००० मध्ये सोनपरी ही मलिका सुरू झाली होती. या मालिकेने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भुरळ घातली होती. मालिकेत सोनाली हे पात्र अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या अभिनेत्रीने साकारले होते. मृणाल दिसायला आजही खूप सुंदर आहे. मालिकांव्यतिरिक्त मृणाल अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये दिसली आहे. मृणाल बऱ्याच दिवसांपासून पडद्यावर दिसली नाही. मात्र अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

 

मृणालने अनेक मालिकांमध्ये काम केले. त्यापैकी श्रीकांत, द ग्रेट मराठा, द्रौपदी, हसरतेन, मीराबाई, टीचर, स्पर्श आणि सोनपरी यात तिच्या प्रमुख भूमिका आहेत. मालिकेव्यतिरिक्त मृणाल ही जाहिरात विश्वातील एक ओळखीचा चेहरा बनली होती. त्यामुळे मृणालला अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिकांच्या ऑफर आल्या. अशात आता ती सिने विश्वात सक्रिय नाही मात्र तिचा मुलगा आणि सून दोघेही अभिनयात मोठे नाव कमवत आहेत.

 

मृणाल कुलकर्णीच्या मुलाचे नाव वीराजस आहे. तो एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक देखील आहे. माझा होशील ना या मालिकेतून त्याला एक मोठी ओळख मिळाली. त्याने आता पर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या पत्नीचे नाव शिवानी रांगोळे असे आहे. हे दोघे बरेच वर्षे एकमेकांना डेट करत होते. ७ मे २०२२ रोजी या दोघांनी लग्न केले.

 

शिवानी ही देखील मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा या मालिकेत रमा बाईंची भूमिका साकारली होती. तसेच या नंतर देखील ती अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकली आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *