सिंघममधील शिवाच्या पत्नीला पाहिलत का? दिसते खूपच सुंदर; करते हे काम

मुंबई | बॉलिवूडच्या सिंघम या चित्रपटाचे आजही लाखो चाहते आहेत. अशात यातील शिवा तुम्हाला आठवतच असेल. पिळदार शरीरयष्टी असलेला हा शिवा लहान पणापासून पहिलवानगी करत होता. आज या बातमीतून त्याच्या पत्नी विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

सिंघम या चित्रपटात शिवा हे पात्र अभिनेता अशोक समर्थ याने साकारले आहे. अशोक हा मूळचा बारामती येथील आहे. लहापणापासूनच पहिलवानगीची आवड असल्याने त्याने १० वी १२ वीमध्ये आखाडे देखील चांगलेच गाजवलेत. अशात त्याच शालेय शिक्षण देखील बारामतीमध्येच पूर्ण झालं. त्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने पुणे गाठलं.

पुण्यात त्याचं शिक्षण सुरू होतं तेव्हाच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यामुळे महाविद्यालयातील अनेक कार्यक्रमात तो आपला अभिनय दाखवायचा. त्यामुळे पुढे त्याने याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे पुढील आयुष्यासाठी त्याने पुणे सोडून मुंबईकडे धाव घेतली. इथे आल्यावर सुरुवातीला थोडा संघर्ष झाला. मात्र त्याची छोट्या पडद्यावरील पहिलीच मालिका हिट ठरली. माझिया प्रियाला प्रीत कळेना ही त्याची पहिली मालिका होती. यातील त्याच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक झाले. त्यानंतर लक्ष या मालिकेतून तो विशेष प्रसिध्दी झोतात आला.

लक्ष या कार्यक्रमात त्याने अभय कीर्तीकर हे पात्र साकारले होते. अभय कीर्तीकर हे एक पोलीस होते. त्यामुळे यात त्याने साकारलेली भूमिका ही लोकहिताची होती. त्यामुळे एकप्रकारे तो अनेक व्यक्तींसाठी देवदूत होता. गुन्हेगारीला हाणून पाडणारा होता.

त्यानंतर त्याने आपलं अभिनयाचं जहाज हे बॉलीवूडच्या दिशेने वळवलं आणि इंसान हा त्याचा मोठ्या पडद्यावरचा पहिला चित्रपट ठरला. यात देखील त्याला खूप यश मिळालं. त्यानंतर सिंघमने तर त्याच्या करिअरला आणखीन उचींच्या शिखरावर नेऊन ठेवलं. यामध्ये अजय देवगण हा मुख्य अभिनेता होता. तसेच त्याने खलनायकाची भूमिका केली होती. शिवा हा आजही नेहकांच्या आठवणीत आहे.

त्यानंतर अशोक समर्थ साल २०१३ मध्ये ट्रॅफिक जॅम या चित्रपटात दिसला. इथे त्याची भेट अभिनेत्री शीतल पाठक बरोबर झाली. या दोघांमध्ये याच चित्रपटाच्या सेटवर मैत्री झाली. पुढे हीच मैत्री प्रेमात बदलली आणि या दोघांनी २१ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्न केले. त्या आधी गेली ८ वर्षे हे दोघे एकमेकांना डेट करत होते.

शितल ही देखील एक नामवंत अभिनेत्री आहे. ती कृपासिंधु या चित्रपटात मिलिंद गवळी यांच्या बरोबर झळकली होती. या चित्रपटामध्ये तिला विशेष प्रसिध्दी मिळाली. अशात शीतल आणि अशोक दोघेही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. तसेच आपल्या सुखी संसारात मग्न आहेत. आता या दोघांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *