महेश कोठारे यांच्या पत्नीला पाहिलंत का? दिसतात खूपच सुंदर; करतात हे काम

मुंबई | मराठी मनोरंजन विश्वाला मोठे करण्यात अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांनी आपले आयुष्य वाहिले आहे. त्यातीलच एक महेश कोठारे. महेश यांनी मराठी चित्रपट सृष्टीला एक वेगळं रूप दिलं. त्यांच्या मुळेच लक्षा, तत्त्या विंचू, कुबड्या खविस अशी भन्नाट पात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनय आणि दिग्दर्शक म्हणून काम केले.

महेश कोठारे हे नेहमीच कोणत्याही कार्यक्रमात एकटे येत नाहीत. त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे आणि पत्नी नीलिमा कोठारे या नेहमी असतात. आपल्या बाबांप्रमाणे त्यांचा मुलगा आदिनाथ देखील आता मराठी अभिनय क्षेत्र गाजवत आहे. अशात महेश कोठारे यांच्या पत्नी नीलिमा या करतात. या बद्दल कुणाला जास्त माहिती नाही. त्यामुळे आज या बातमीतून नीलिमा यंच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

नीलिमा कोठारे या एका प्रतिष्ठित घराण्यातील आहेत. त्यांचे वडील एक डॉक्टर होते. त्यामुळे अभिनय आणि त्यांचा कधीच संबंध आला नव्हता. मात्र त्यांना कपडे डिझाईन करण्याची आवड होती. त्यामुळे महेश यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या एक फॅशन डिझायनर म्हणून करिअर कडे वाटचाल करू लागल्या. झपाटलेला या चित्रपटातून त्यांनी या कामाला सुरुवात केली. या चित्रपटातील सर्व कलाकारांसाठी त्यांनी कपडे तयार केले होते.

जय मल्हार ही मालिका काही वर्षांपूर्वी खूप गाजली होती. यामध्ये म्हाळसा, बानू अशा सर्वच पात्रांसाठी त्यांनी कपडे डिझाईन केले होते. महेश यांच्या पत्नी नीलिमा कोठारे या दिसायला देखील खूपच सुंदर आहेत. एका कार्यक्रमात महेश कोठारे यांनी त्याच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला होता. त्यांचे असे मत आहे की, नीलिमा यांच्या बरोबर लग्न केल्याने ते खूप प्रसिद्ध झाले. त्यांचे काम लोकांनां आवडू लागले आणि त्यांची भरभराट झाली.

नीलिमा आणि महेश यांचे अरेंजमॅरेज पद्धतीने लग्न झाले. अभिनयातील सुरुवातीच्या काळात महेश कोठारे यांचा प्रभाव तितकासा नव्हता. त्यामुळे त्यांनी अनेक गुजराती चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. हा काळ त्यांच्या साठी खूप स्ट्रगलचा काळ होता. याच दरम्यान त्यांचे नीलिमा यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर त्यांनी काढलेले सर्वच चित्रपट खूप हिट ठरले. हा त्यांच्या पत्नीचा पायगुण असल्याचे ते मानतात.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *