हार्दिक पांड्याला टीममध्ये घेतलं! अन् पठ्याने जिंकले तब्बल एवढे कोटी

दिल्ली |   क्रिकेट मॅच खेळताना हा तरुण एक कोटी रुपयांचा मालक बनला. हे बऱ्याचदा कमी घडताना दिसत असलं तरीही यात तथ्य आहे. या घटनेनं कुटुंबात आनंदाला थारा नव्हता. नोटिफिकेशननंतर सौरभने अकाऊंट चेक केले असता त्याच्या खात्यात 70 लाख रुपये दिसले. आरा जिल्ह्यातील चारपोखरी ब्लॉकमधील ठाकुरी गावातील सौरभ कुमार खूप काळापासून ड्रीम इलेव्हनवर एक टीम तयार करून पैसे गुंतवत असायचा.

काय म्हणाला सौरभ – मंगळवारी संध्याकाळी ड्रीम-11वर झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या टी-20 मालिकेतील सामन्यात भारतीय संघाचे खेळाडू फलंदाज सूर्य कुमार यादव, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, गोलंदाज उमेश यादव आणि ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू विकेटकिपर एम. वार्डे, फलंदाज. एस स्मिथ, टी डेव्हिड, सी ग्रीन, गोलंदाज जे हेझली ओड आणि नॅथन आयल्स यांनी चांगली कामगिरी करून नशीब आजमावलय.

सामना संपल्यानंतर त्याला एक कोटी रुपये जिंकण्याचा मेसेज आला. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर सौरभ खूप आनंदी आहे. त्यानी सांगितले की त्याच्या खात्यात सुमारे 70 लाख रुपये आले आहेत. सुमारे 30 लाख रुपये कर कपात करण्यात आला आहे. गावातील तरुणानी एक कोटी रुपये जिंकल्याची चर्चा संपूर्ण गावात आणि जिल्ह्यात सुरू आहे.

सौरभ कधीपासून खेळायचा ड्रीम 11 – 2019 पासून तो ड्रीम इलेव्हन ॲपवर एक टीम बनवत आहे. यामध्ये त्याने अनेकदा हजारो रुपये जिंकले आणि हरले देखील आहेत. सौरभ पदवीचे शिक्षण घेत असून  अभ्यासासोबतच त्याला क्रिकेटमध्येही खूप रस आहे. चारपोखरी ठाकुरी गावातील रहिवासी व्यंकटेश सिंह यांचा मुलगा सौरभ कुमारन ड्रीम इलेव्हन ॲपवर आपला युजर आयडी दुसऱ्या नावान तयार केला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *