आनंदाची बातमी, कृणाल पांड्या आणि पंखुरीने दिला बाळाला जन्म…

मुंबई| भारतीय क्रिकेटर कृणाल पांड्याच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. कृणाल पांड्याची पत्नी पंखुरीने एका बाळाला जन्म दिला आहे. क्रुणालने सोशल मीडियावर ही माहिती दिली असून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कृणालने पत्नी पंखुरी आणि मुलासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यावेळी त्याने आपल्या मुलाचे नावही सांगितले आहे. दोघांनीही आपल्या मुलाचे नाव कवीर कृणाल पंड्या असे ठेवले आहे.

कृणाल पांड्याने टीम इंडियासाठी टी-20 आणि वनडेमध्ये पदार्पण केले आहे. तो सुरुवातीला इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससोबत होता आणि आता तो लखनौ सुपर जायंट्सचा उपकर्णधार आहे. क्रुणाल पंड्याचा भाऊ हार्दिक पंड्या नुकताच इंग्लंडविरुद्ध वनडे-टी-20 मालिका खेळत होता.

कृणाल-पंखुरीचे लग्न २०१७ मध्ये झाले होते. पंखुरी इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे आणि ती एक मॉडेल आहे. कृणाल पंड्याच्या या पोस्टवर सर्वांनी अभिनंदन असा वर्षाव केला आहे. दोघांचे खूप खूप अभिनंदन अशी प्रतिक्रिया केएल राहुलने दिली. तर हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने हार्ट इमोजी शेअर केले आहेत. झहीर खानची पत्नी सागरिका हिनेही कृणाल-पंखुरीला कमेंट करून शुभेच्छा दिल्या. लव

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *