गोविंदाला झाला होता हा गंभीर आजार; तो किस्सा पाहून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | गोविंदा बॉलिवूडमधील एक अस नाव ज्याच्या कामाला लोक आजही दाद देतात. गोविंदाने त्याच्या काळात बॉलीवूड दणाणून सोडल होतं. आज तो या रुपेरी पडद्यावर झळकत नाही. रुपेरी पडद्यापासून तो बराच दूर गेला आहे. मात्र आजही तो अनेक रियालिटी शो आणि सामाजिक कार्यक्रमात मग्न असलेला दिसतो.

प्रत्येक सामाजिक संस्थेसाठी तो काम करतो. लोकांना गरिबांना मदत करतो. अशात एका कार्यक्रमात त्याने त्याच्या बालपणीचा एक दुःखद किस्सा सांगितला आहे. त्याचा हा किस्सा अनेकांच्या काळजाला पिळवटून टाकणारा आहे. यामध्ये त्याने त्याच्या आजारा विषयी मोठा खुलासा केला आहे. त्याला लहानपणी एक गंभीर आजार झाला होता. ज्यामध्ये त्याला खूप शारीरिक वेदना सहन कराव्या लागल्या.

त्याने सांगितले की, ” मी ७ वर्षांचा होतो तेव्हा मी खूप आजरी झालो होतो. माझे शरीर निळे पडले होते. त्यावेळी मला रोज इंजेक्शन घ्यावे लागत होते. त्यामुळे अगदी डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत सगळीकडे त्याच्या निषाण्या झाल्या होत्या. यामुळे मला खूप त्रास व्हायचा. हा असा आजार होता ज्यात माझे केस गळून गेले होते. माझे डोक्याचे नाही तर शरीरावरील सर्वच केस गळून गेले होते. अगदी माझी एक भुवयी देखील गळून पडली होती. ”

पुढे त्याने सांगितलं की, ” मला अस वाटत होत माझं आयुष्य काही दिवसांपुरत मर्यादित आहे. त्यामुळे मी आईला एक दिवस विचारलं तेव्हा आई म्हणाली तू लवकरच ठीक होणार आहेस. मात्र माझी आई माझं मन राखण्यासाठी हे बोलत आहे असं मला वाटलं. त्यामुळे मी डॉक्टरांना देखील भेटलो आणि त्यांना विचारलं की, माझ्याकडे किती दिवस आहेत. त्यावर ते म्हणाले की, तू एक दिवस खूप मोठा स्टार होणार आहेस. तुझ्या चेहऱ्यावरून लोक तुला ओळखतील. त्यांचे ते बोल पुढे खरे ठरले.

मी आजारी असल्याने आई मला अनेक साधू आणि फकीर बाबांकडे घेऊन जात होती. मला त्यांची सेवा करण्यास सांगत होती. त्यावेळी मला हे अजिबात आवडत नव्हते. मात्र आता मला समजते की ती मला असे करायला का सांगत होती. ” गोविंदा यांना त्यांच्या आजारपणात त्यांच्या आईने खूप मदत केली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *