खुशखबर! मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेनी दिली खुशखबर

मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील गाजलेल्या अभिनेत्रींमध्ये मुक्ता बर्वे हे नाव प्रथम घ्यावे लागेल. मुक्ताने छोट्या पडद्यावर पदार्पण करून आपल्या अभिनायची सुरुवात केली. त्याआधी अनेक नाटकं आणि एकांकीका यामध्ये ती दिसली. नंतर मालिका आणि चित्रपटांमधून तिने प्रचंड प्रसिध्दी मिळवली.

नुकताच तिचा वाय हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने साहसी महिलेची भूमिका रेखाटली. तिच्या या भूमिकेचे सर्वांनी विशेष कौतुक केले. तिच्या अभिनयाने तिने यावेळी देखील चाहत्यांची आणि समीक्षकांची मने जिंकून घेतली. आता मुक्ताने आणखीन एक गोड बातमी दिली आहे.

अभिनयाचा दांडगा अनुभव असलेली मुक्ता नाटकांमध्ये काम करणे जास्त पसंत करते. तिला छोट्या आणि मोठ्या पडद्यापेक्षा रंगभूमी अधिक आवडते. यामुळे ती जास्त वेळा रंगभूमीवर दिसते. आता तिने याच रंगभूमीविषयी चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. लावकरच ती आणखीन एका आगामी नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

काही वर्षांपूर्वी चारचौघी हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्या काळी हे नाटक प्रचंड गाजलं होतं. आता पुन्हा एकदा हे नाटक मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. नाटकाच्या नावरून हे नाटक नक्कीच चार महिलांभोवती फिरणारं असावं असं समजतं. नुकतेच मुक्तने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या नाटकाचे पाहिले पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत तिने त्या चार चौघी कोण? असा प्रश्न देखील विचारला आहे.

आता या नाटकाची सगळीकडे चर्चा रंगली आहे. अनेक चाहत्यांनी तिला या नाटकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. साल २०१६ साली आलेले कोडमंत्र हे नाटक तिने खूप गाजवले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती चारचौघीमध्ये दिसणार आहे. मुक्ताने आजवर घर तिघांचं असावं, आम्हाला वेगळे व्हायचे, बेहभान, फायनल ड्राफ्ट, कब्बडी कब्बडी अशा नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

तसेच घडले बिघडले, पिंपळ पान, बंधन, बुवा आलो, लढ्ढा, मधू इथे अन् चंद्र तिथे अशा अनेक मालिकांमध्ये मुक्ता दिसली आहे. तिचा मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट प्रचंड गाजला. तसेच जोगवा या चित्रपटात देखील तिची बेधडक भूमिका दिसली. चकवा हा तिचा पहिला चित्रपट होता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *