खुशखबर! BBM4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

मुंबई|  टीव्ही कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक वादग्रस्त आलेला कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”. हा कार्यक्रम जितका वादग्रस्त आहे त्याहून अधिक रंजक आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. अशात बिग बॉस हिंदी प्रमाणे बिग बॉस मराठीला देखील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

आता पर्यंत बिग बॉस मराठीचे तीन पर्व पूर्ण झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक याच कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात याच प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण येत्या काही दिवसांत बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होत आहे.

कलर्स मराठी या वाहिनीवर हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. याची माहिती रविवारी समजली. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या कार्यक्रमाचा एक टिझर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अद्याप तारीख नेमकी कोणती आहे हे सांगितले नाही. मात्र लवकरच हा कार्यक्रम सुरू होणार आहे. अशात आता प्रेक्षक यामध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची चर्चा करत आहेत.

या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वाचे होस्टींग देखील दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहेत. याच कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वात त्यांना कर्करोग असल्याचे समजले होते. त्यावेळी त्यांनी मोठ्या मेहनतीने याचे शुटींग पूर्ण केले. मात्र आता महेश मांजरेकर पूर्णतः बरे झाले आहेत. त्यामुळे या पर्वात देखील तेच सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. अशात आता या कार्यक्रमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *