Good News | दोन दिवस चर्चा अन् त्यानतंर सोनालीची डिलिव्हरी झाली

मुंबई | बॉलीवूडमध्ये सध्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी डोकं वर काढलं आहे. करीना आणि ऐश्वर्या या दोन्ही अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली आहे. अशात आता यामध्ये आणखीन एका मराठी अभिनेत्रीचा देखील समावेश झाला आहे. या मराठ मोळ्या अभिनेत्रीच नाव आहे सोनाली कुलकर्णी.

सोनाली सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या अभिनयामुळे आज ती संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करत आहे. नुकताच तिचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे ती खूप खुश आहे. तसेच यातील तिचं गरमागरम कवरेज हे गाणं भन्नाट गाजत आहे. चाहत्यांना तिच्या या गाण्याचं वेड लागलं आहे.

अशात नुकतेच सोनालीने एक फोटोशूट केले आहे. यामध्ये ती तिचा पती बरोबर दिसते आहे. तसेच तिने यावेळी निवडलेले आऊटफिट खूप सुंदर आहे. या आउटफीट वरूनच तिच्याविषयी एक चर्चा रंगली. तिने यावेळी काळ्या रंगाचा एक ड्रेस घातला आहे. यावर सफेद रंगाचे ठिपके आहेत. या ड्रेस वरचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अशात या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि हार्ट ईमोजीचा वर्षाव केला. तसेच अनेकांनी तुफान कमेंट्सचा वर्षाव केला. यातील एका युजरने तिला विचारलं की, ” तू प्रेग्नेंट आहे का?” तर दुसऱ्या एकाने लिहिलं की, ” काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा हा ड्रेस प्रेग्नेंसीच्या हिंट देत आहे.” यामुळे सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीची एकच चर्चा सुरू झाली.

अशात या सर्व चर्चा पाहून तिने चाहत्यांना मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तिला ज्यांनी अशी कमेंट केली होती. त्यांच्या कमेंटला तिने उत्तर देत. या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तिने उत्तर देत लिहिलं आहे की, ” ज्यांना माझ्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न पडत आहेत त्यांना सांगते की, मी प्रेग्नेंट नाही. माझी डिलिव्हरी झाली आहे. आणि मी माझा अभिनय आणि डान्स डीलिवर केला आहे. लवकर जाऊन तमाशा लाईव्ह पाहा.” अस ती या मध्ये म्हटली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *