नशीब! वडिलांचं 60 वर्षांपूर्वीच पासबुक सापडलं, अन् एका रात्रीत मुलाच नशीब पालटलं; वाचून चकित व्हाल

अमेरिका | कुणाचा नशिबात काय घडेल हे सांगता येत नाही. खर तर त्या योगायोगाच्या बाबी असतात. अशीच एक घटना घडली आहे. महत्वाची कागदपत्र आपण नेहमीच जपून ठेवतो, कधी कोणत्या कामासाठी त्याचा उपयोग होईल हे सांगता यत नाही. अशाच जपून ठेवलेल्या कागदपत्रांमुळे एक तरुण रातोरात कोट्यधीश झाला.

वास्तविक हे प्रकरण दक्षिण अमेरिकेतील चिली येथे राहणाऱ्या एक्सल हिनोजोसाशी संबंधित आहे. 1960 आणि 70 च्या दशकात हिनोजोसाच्या वडिलांनी 163 डॉलर म्हणजेच 12,684 रुपये बँकेत जमा केले. हे पैसे त्याने आपल्या स्वप्नातील घर घेण्यासाठी उभे केले.

हिनोजोसाच्या वडिलांनी ही रक्कम क्रेडिट युनियन बँकेत जमा केली, जी आता बंद आहे. दरम्यान, हिनोजोसाच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर हिनोजोसाने वडिलांच्या सामानासह पासबुक एका बॉक्समध्ये ठेवले.

वडिलांच्या डब्यात काहीतरी शोधत असताना अचानक हिनोजोसाला पासबुक मिळाल. हिनोजोसाला बँकेत जमा केलेल्या रकमेवर स्टेट गॅरंटी असे शब्द वाचायला मिळाल. त्यानंतर, व्याजदर आणि महागाई पाहता, त्याला वाटले की त्याच्या वडिलांनी वाचवलेली रक्कम आता $1.2 दशलक्षच्या जवळपास पोहोचली असेल. जर तुम्ही ही रक्कम आत्ताच्या प्रमाणे रूपयाप्रमाण गृहीत धरली तर ती सुमारे 9.33 कोटी एवढी किंमत आहे.

न्यायालयान मुलाच्या बाजून दिला न्याय:
ही रक्कम राज्य हमी म्हणून परत मिळावी, असा दावा हिनोजोसा यांनी सरकारकडे केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाने हिनोजोसाच्या बाजूने निकाल दिला. हिनोजोसाच्या वडिलांनी कठोर परिश्रम करून ही रक्कम जमा केली आहे, त्यावर राज्य हमी असेल तर त्यांना ती परत मिळालीच पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. बँक पासबुकचे भवितव्य आता अंतिम न्यायालयाच्या दारात आहे. हिनोजोसाला जवळपास 10 कोटी रुपये मिळू शकतात.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *