नशीब! आई आणि मुलगा एकाच वेळी लोकसेवा आयोगाची परीक्षा पास

मुंबई | यूपीएससी परीक्षेत यशस्वी व्हावे असे अनेक तरुण मुलं तसेच त्यांच्या आई बाबांना वाटत असते. अशात आता लोक सेवा आयोगाच्या याच परीक्षेत आई आणि मुलगा हे दोघेही यशस्वी झाले आहेत. केरळ येथील मल्लपुरमध्ये ४२ वर्षीय आई आणि २४ वर्षीय मुलगा एकत्र या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. आईचे नाव बिंदू असे आहे तर मुलाचे नाव विवेक आहे. या दोघांनी मिळवलेल्या यशाने सर्व जण चकित झाले आहेत. तसचं आता त्यांच्यावर कौतुकाचा मोठा वर्षाव होत आहे.

या दोघांनी लोकसेवा आयोगाची ( पीएससी.) ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. दरम्यान विवेकने दिलेल्या माहितमध्ये त्याने सांगितले की, ” मी आणि माझी आई आम्ही दोघांनी एकत्र क्लास लावला होता. यावेळी माझ्या आईने मला खूप मोलाची साथ दिली. तसेच बाबांमुळे हे यश आम्हाला मिळाले. त्यांनी आम्हा दोघांना खूप मदत केली.

सर्व सुख सोई त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या. आम्ही एकाच क्लासमध्ये शिकलो. तेथील शिक्षकांनी देखील खूप छान मार्गदर्शन केलं. आम्ही पास होऊ अशी आम्हला आशा होती. मात्र एकच वेळी आम्ही दोघांनी मिळवलेले हे यश पाहून आम्ही देखील चकित झालो आहोत. हे असे होईल याचा आम्ही विचार केला नव्हता. मात्र आता आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत. ”

बिंदू या ४२ वर्षांच्या आहेत. जेव्हा त्या या परीक्षेला बसल्या तेव्हा त्यांना अनेकांनी वेगवेगळे प्रश्न विचारले होते. तुमचे वय एव्हढे जास्त आहे तर तुम्ही कशी काय ही परीक्षा देता. यावर त्यांनी मस्त उत्तर देत सगळ्यांची बोलती बंद केली. त्यांनी सांगितले की, ” स्ट्रीम २ या पदासाठी कमाल वय ४० आहे. अशात यात ओबीसी प्रवर्गात ३ वर्षांची सूट आहे. तर एसटी आणि एस सीला ५ वर्षांची सूट दिली आहे. यासह अस्थिव्यंग असलेल्या व्यक्तींना १० आणि दिव्यांगांना १५ वर्षांची सूट आहे. यातील एक सूट मला देखील मिळाली. त्यामुळे मी हा निर्णय घेतला.”

यूपीएससी परीक्षा संदर्भात एका मंत्रांनी सांगितले की, ” आयएएस आणि आयपीएस या पदांच्या भरतीसाठी लोकसेवा आयोग नेहमीच भरती काढत असते. IPS अधिकार्‍यांच्या संदर्भात,IPS चे प्रमाण CSE-2020 वरून CSE द्वारे 200 पर्यंत वाढवले आहे. पदोन्नती कोठ्यातील भरतीसाठी राज्य सरकार मार्फत बैठका घेऊन यावर निर्णय घेतला जातो. मसूरी-आधारित लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेश ही नागरी सेवकांसाठी देशातील प्रमुख प्रशिक्षण संस्था आहे. तसेच मागच्या सहा महिन्यात विविध पदासाठी भरती व्हावी अशी मागणी आहे. “

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *