घरच्यांच्या विरोधात जाऊन अभिनयात टाकले पाऊल; आज ही अभिनेत्री कमावते तब्बल ९५ कोटी

मुंबई | चित्रपट सृष्टीतील नव्वदच्या दशकातील काळ हा एक सुवर्ण काळ असल्याचे म्हटले जाते. या काळात अनेक कलाकारांनी बॉलीवूडमध्ये पाहिले पाऊल ठेवले. यातील अनेक कलाकार हे आजही बॉलीवूड गाजवत आहेत. तसेच या काळात अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक उदयास आले. यातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली.

काही कलाकारांनी खूप कमी काळ बॉलीवुडमध्ये काम केले. मात्र त्यांच्या कामाची छाप आजही अनेकांच्या मनात कायम आहे. बऱ्याच अभिनेत्री या सुरुवातीला भरपूर चित्रपट करतात. प्रसिध्दी आणि नाव कमवतात, मात्र लग्न झाल्यावर त्या संपूर्ण वेळ कुटुंबाला देतात.

या मध्ये अनेक अभिनेत्रींची उदाहरणे देता येतील. करिष्मा कपूर, रविना टंडन, जुही चावला, आयशा जुल्का आणि सोनाली बेंद्रे सारख्या या सुंदर अभिनेत्रींनी लग्न नंतर बॉलीवूड मधून काढता पाय घेतला आहे. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी असे केले आहे. मात्र यातील अनेक अभिनेत्री आज अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी देखील त्या एक मोठ्या बीजनेस वूमन आहेत.

प्रत्येक व्यक्ती आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मोठी धडपड करत असतो. अशीच धडपड अभिनेत्री आयशा जुल्काने देखील केली. एका शोमध्ये तिने आपल्या आयुष्यातील स्ट्रगल विषयी सांगितले होते. आयशा ही बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीं पैकी एक आहे. तिने सुस्वतीला काही तमिळ चित्रपटात काम केले नंतर ती बॉलीवुडमध्ये आली.

ही अभिनेत्री दिसायला तर खूपच सुंदर होती. मात्र तितकाच सुंदर तिचा अभिनय देखील होता. आजही अनेक चाहते तिच्या भूमिका असलेले चित्रपट आवडीने पाहतात. सुरुवातीस तिच्या कुटुंबीयांनी तिला अभिनयासाठी परवानगी दिली नव्हती.

मात्र तिने शिक्षण पूर्ण झाल्यावर काही तमिळ चित्रपट केले. नंतर तिने जो जिता वही सिकंदर या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. कुरबान, खिलाडी, मेहरबान, दलाल, बालमा, वक्त हमारा है, रंग, संग्राम, जय किशन आणि मासूम असे अनेक हिट चित्रपट तिने साकारले.

मात्र लग्न नंतर या अभिनेत्रीने देखील बॉलिवूड सोडून दिले. तिने उद्योजक समीर वाशी यांच्याशी लग्न केले. त्यानंतर तिने पूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला दिला. मात्र आज ती एक दोन नाही तर तब्बल पाच कंपन्यांची मालकीण आहे. Samrock developers या कंपनीची ती आता मालकीण आहे. यातून ती करोडो रुपये कमावते. ही कंपनी हॉस्पिटॅलिटी सर्विसेस देते.

गोव्यामध्ये देखील या कंपनीची ब्रांच आहे. तिचे आणि तिच्या पतीचे करोडोंची संपत्ती असलेले हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत. यामध्ये स्पा आणि ब्युटी पार्लर अशा अनेक सुविधा देखील आहेत. याच सोबत अभिनेत्री आता रिटेलिंगच्या बिजनेसमध्ये देखील सक्रिय झाली आहे. सध्या ही अभिनेत्री अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी बिजनेस मुळे तिची नेट वर्थ 84 ते 95 कोटींची आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *