देवाचीच कृपा! तिन युवक ठार दोन जखमी मात्र पाच वर्षांचा चिमुकला अगदी ठणठणीत ….!

सातारा | दैव तारी त्याला कोण मारी ही म्हण आता पर्यंत तुम्ही अनेक वेळा ऐकली असेल. मात्र आता याच म्हणीची प्रचिती घडवणारी एक घटना घडली आहे. एका तिहेरी भीषण अपघातात तीन व्यक्ती जागीच ठार झाल्या आहेत. तर दोघं जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र यात एक लहान मुलगा अगदी सुखरूप आहे. त्याला कोणतीही इजा झालेली नाही.

सातारा-लातूर महामार्गावर (पंढरपूर) गोंदवले खुर्दजवळ २ ऑगस्ट रोजी झालेल्या तिहेरी अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त वाहने सुमारे तीनशे फूट अंतरापर्यंत फरपटत गेली आणि त्यांचा चक्काचूर झाला आहे. अपघातात एकाच गावातील तीन युवक मृत्यूमुखी पडले आहेत. हे युवक माण तालुक्यातील पळशी येथील आहेत. त्यामुळे संपूर्ण गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे. एकाच गावातील तीन युवकांचा मृत्यू झाल्याने सर्व गाव हळहळ व्यक्त करत आहे. मात्र यात आश्चर्य कारक बाब म्हणजे गाडीत असलेला ५ वर्षांचा चिमुकला सुखरूप आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही.

स्विप्ट कार (एमएच 05 व्ही 9695) व बुलेट यांची समोरासमोर मोठी धडक झाली. या धडकेत बुलेटस्वार युवक उंच हवेत फेकले गेले. यावेळी रस्त्याने एक (एमएच 13 एसी 1749)ही करुझर चालली होती. यातील एक जण क्रुझरवर जोरात आदळला. यात त्याचा जागीच जीव गेला. इतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. सदर मुलांची नावे तुषार लक्ष्मण खाडे (वय 22 ), महेंद्र शंकर गौड (वय 21)
अजित विजयकुमार खाडे (वय 23) हे तरुण रा. पळशी, ता. माण येथील होते.

तर कारमधील निवृत्त पोलीस आनंदराव ढेंबरे (वय 62) हे पिंपरी येथून मुलगा गणेश ढेंबरे (वय 28) व नातू विहान गणेश ढेंबरे( वय 5)यांच्याबरोबर निघाले होते. सदर कुटुंबीय रा. दीडवाघवाडी, ता. माण येथील रहिवासी आहेत. या गाडीच्या अपघातात आनंदराव ढेंबरे आणि त्यांचा मुलगा गणेश ढेंबरे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र यात वुहानला काहीच झाले नाही. पोलीस सदर घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *