तरुणीवर गो’ळी’बा’र, घटणा CCTV मध्ये कैद

पालघर | तरुणान एका तरुणीवर गोळीबार करून हत्या केल्याचा प्रकार पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये घडली. या घटनेमुळे बोईसरमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेचे तपशील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. तरुणाने केलेल्या गोळीबारात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तरुणाने संरक्षण दलाच्या वाहनाखाली येत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात हा तरुण गंभीररित्या जखमी झाला. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टीमा रुग्णालयालगत तरुणान पिस्तुलने बुधवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास गोळीबार केला. तरुणीचं नाव नेहा दिनेश महतो अस आहे. तसेच गोळीबार केलेल्या तरुणाच नाव कृष्णा सत्यदेव यादव अस आहे. घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर डी-डेकॉर कंपनीसमोर आरोपीने संरक्षण दलाच्या वाहनाखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

प्रेमप्रकरणातून झाली हत्या :
कृष्णा जबर जखमी झाला आणि त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एवढच नाही तर उपचारा करत असताना त्याचा मृत्यू झाला. गोळीबार करताना जे पिस्तूल वापरण्यात आल होत ते पुस्तक पोलिसांनी जप्त केल. बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना प्रेम प्रकरणातून घडण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी अधिक तपास बोईसर पोलीस करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *