आईने दिलेलं चॉकलेट खाऊन मुलीचा झाला मृत्यू

मुंबई | चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडत. चॉकलेट आवडत नाही अशा खूपच कमी व्यक्ती असतील. अशात लहान मुलांसाठी चॉकलेट म्हणजे स्वर्गच जणू. लहानपणी तुम्ही देखील चॉकलेटचा बंगला हे गाणं ऐकलं असेल. लहान मुले नेहमीच चॉकलेटचा हट्ट करताना दिसतात. अशात लहान मुलं एखादी गोष्ट ऐकत नसतील किंवा रडत असतील तर लगेच त्यांना चॉकलेट देऊन गप्प केले जाते.

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का हे चॉकलेट कुणाचा जीव घेऊ शकते. नाही ना मात्र काळीज पिळवटून टाकणारी अशी एक सत्य घटना घडली आहे. यामध्ये एका लहान मुलीला तिच्या आईने चॉकलेट दिल्याने तिचे निधन झाले आहे. आपल्या बाळाला गमवल्याने त्या आईने रडून आक्रोश केला आहे.

सदर घटना कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील बिजुर गावात घडली आहे. इथे सानवी नावाची एक ६ वर्षांची मुलगी तिच्या आई बाबांबरोबर राहत होती. काही दिवसांपूर्वीच ही घटना घडली आहे. सानवी ही इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत होती. ती एक दिवस शाळेत जाण्यासाठी नकार देत होती.

त्यामुळे तिच्या आई बाबांनी तिला समजवलवले आणि चॉकलेट देऊन शाळेत जाण्यास सांगितले. तिला तिची आई शाळेच्या बस जवळ घेऊन गेली. सानवी बसमध्ये बसली त्यावेळी चॉकलेट तिच्या हातात होते. नंतर बस शाळेजवळ आली तेव्हा लगेचच तिने घाईघाईत ते चॉकलेट कागदा सकट खाल्ले.

त्यामुळे तिला त्रास झाला. बसमधून खाली येताच ती बेशुद्ध पडली. त्यामुळे तिला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले मात्र यात तिचा जीव गेला. अशात या घटनेने सर्वत्र शोकाकुल वातावरण पसरले आहे. आई बाबांनी दिलेले हे चॉकलेट आपल्या मुलीच्या जीवावर बेतेल याचा त्यांनी विचार देखील केला नव्हता. मात्र दुर्देवाने ही घटना घडली आहे. त्यामुळे ते दोघे देखील खूप दुःखात आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *