आमिष दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार; घटनेनं परिसर हादरला

जयपूर | आजही आपल्या देशात महिला ही सुरक्षित राहिलेली नाही. दिवसेंदिवस बलात्कार सारख्या घटनांना महिलांना सामोरे जावे लागत आहे. देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होतं चालली आहे. अनेक पोलिसांची पथके यासाठी कामाला लागलेली आहेत. सापळा रचून अनेक नराधमांना गजाआड केले जात आहे. मात्र अजूनही बलात्काराच्या घटना थांबलेल्या नाहीत.

अशात आता आणखीन एक अशीच तळपायाची आग मस्तकात जाणारी घटना घडली आहे. एका महिलेला जयपूर रेल्वे यार्ड परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला गेला आहे. या घटनेने परिसरात महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झला आहे. सदर महिला ही ३५ वर्षीय असून ती महाराष्ट्राची रहिवासी आहे. घटना घडल्यानंतर महिलेच्या पतीने या बाबत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील या महिलेने जयपूरमधील एका व्यक्ती बरोबर विवाह केला. हे दोघे रेल्वेने दिल्लीला जात होते. रेल्वेने प्रवास करत असताना या दोघांकडे आरक्षित तिकीट नव्हते. महिला काही समान घेण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आली होती. इथे समान घेत असताना तिला एक व्यक्ती भेटला त्याने तिला आरक्षित केलेले तिकीट मिळवून देईल असे सांगितले. यावर महिला त्याच्या बरोबर गेली. त्याने तुला रेल्वे यार्ड परिसरातील एका अज्ञात ठिकाणी नेले. त्या ठिकाणी आखिन तीन ते चार व्यक्ती आधीच उपस्थित होत्या. महिला दिसताच या सर्वांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत पीडितेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संपूर्ण घटना ऐकून कलम ३७६ डी अंतर्गत या घटनेची नोंद केली आहे. तसेच महिलेचा जबाब नोंदवून घेत तिने सांगितल्याप्रमाणे सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. तसेच महिलेची वैद्यकीय चाचणी देखील केली जात आहे. यात येणाऱ्या रिपोर्ट नुसार पुढील तपासाला वेग येणार असल्याचे पोलीस म्हणाले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *