खेळ नियतीचा! एकाच वेळी पाच मुलांना दिला जन्म, त्यातील एकालाही वाचवू शकली नाही ही दुर्दैवी आई….

आई बाबा होणं हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील एक सुखद क्षण आहे. त्यामुळे प्रत्येकाला तो आयुष्यात अनुभवावा असे वाटते. मात्र हेच मातृत्वाचं सुख एका आईला गेली ७ वर्षे अनुभवता आलं नाही. आता तिच्या पदरी हे सुख आलं मात्र देवाने ते तिच्याकडून पुन्हा एकदा ते हिरावून घेतलं आहे. एका आईची सर्व मूल जन्म झाल्यानंतर वारली आहेत.

ही दुःखद घटना करौलीच्या मसलपुरमधील पिपरानी येथे घडली आहे. या गावातील एका महिलेला लग्नाला सात वर्षे होऊन देखील मूल होतं नव्हतं. सात वर्षांनी ती गरोदर राहिली. कुणाला जुळी मुलं होतात तर कुणाला तिळी होतात. मात्र या महिलेने एकाच वेळी पाच मुलांना नऊ महिने आपल्या पोटात वाढवले. तिला दिलेल्या तारखेला आज तिची प्रसूती झाली. मात्र जन्माला आल्यानंतर ही पाचही मुलं मृत पावली. यातील एकाही बाळाला जीवनदान मिळाले नाही.

सदर महिलेला तीन मुली आणि दोन मुलं झाली होती. सात वर्षांनी घरात पाळणा हलणार असल्याने घरातील सर्वच सदस्य खूप आनंदी होते. आपण पाच मुलांना जन्म देणार आहोत याची कल्पना सदर महिलेला आधीच होते. एकाच वेळी आपण पाच मुलांना जन्म देणार असल्याने ही महिला आणखीनच आनंदी झाली. सात वर्ष आई होता आलं नाही त्यामुळे ती खूप दुःखी होती. मात्र सात वर्षांनी तिला हे सुख अनुभवायला मिळणार होतं आणि त्यातही ती एका मुलाची नाही तर तब्बल पाच मुलांची आई होणार होती.

ज्यावेळी मुलं जन्माला आली त्यावेळी ती खूप कमजोर होती. प्रीमॅच्युअरबेबी असल्याने या मुलांचे वजन ३०० ते ६६० ग्रॅम एवढेच भरले होते. एवढ्या कमी वजनाची मुलं जन्माला आल्याबरोबर डॉक्टरांना समजले की ही मुलं फार काही दिवस जगू शकणार नाही. मात्र आपल्या पाचही मुलांना जीवनदान मिळावे म्हणून त्या आईने डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व मुलांना जयपूरमधील एका रुग्णालयात भरती केले. तिथे त्यांच्यावर शर्तीचे उपचार करण्यात आले. आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आईने खूप मेहनत घेतली आणि अटीतटींचा सामना केला. मात्र दुर्दैव असं की, या आईचं एकही बाळ वाचलं नाही. सदर महिलेचे नाव रेश्मा असे आहे. आपल्या मुलांच्या निधनाने ती पूर्णतः कोसळून गेली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *