बालपणीपासून आतापर्यंत या दोन्ही चिमुकलींनी आपली मैत्री ठेवली आहे घट्ट, दोघी आहेत स्टार किड

मुंबई | प्रत्येकच व्यक्तीच्या आयुष्यात बालपण खूप गोड असतं. आपण काही केले, कितीही मस्ती केली तरी थोडाफारच ओरडा खावा लागतो. अशात बालपणीच्या मैत्रीची मजाच काही ओर असते. ही मैत्री पूर्णतः निखळ आणि निस्वार्थी असते. लहान मूल हळूहळू मोठी हातात आणि त्यांचे वेगळे मित्र बनतात. मात्र बालपणीच्या मैत्रीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतं आहे. या मध्ये दोन छोट्या मुली दिसत आहेत.

यातली एक मुलगी खाली उभी आहे आणि दुसरीला तिने आपल्या मैत्रिणीला खांद्यावर घेतलं आहे. या दोघी देखील फोटोमध्ये खूप क्यूट दिसत आहेत. अशात या कोणी सध्या सुध्या मुली नसून दोघीही स्टारकीड आहेत. त्यातील एकीने तर आता बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे, तर दुसरी देखील त्याचं मार्गावर आहे. अनेक व्यक्ती या दोघी नेमक्या कुणाच्या मुली आहेत याचा शोध घेत आहेत.

काहींना या दोघींची ओळख सहज पटली आहे. मात्र काही जण अजूनही त्यांना ओळखू शकले नाहीत. त्यामुळे या दोघींना ओळखण्यासाठी आम्ही तुमची मदत करणार आहोत. मंडळी फोटोमध्ये दिसत असलेल्या दोन्ही चिमुकल्या दिग्गज अभिनेते चंकी पांडे आणि बॉलीवूडचा किंग खान असलेला शाहरुख खान या दोघांच्या मुली आहेत. आता यातली शाहरुखची नेमकी कोणती आणि चंकी पांडे यांची कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर खाली उभी असलेली मुलगी ही अनन्या पांडे म्हणजेच चंकी पांडे यांची मुलगी आहे. तसेच खांद्यावर बसलेली चिमुकली ही शाहरुख खानची परी सुहाना खान आहे.

या दोघींचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दोघीही लहानपणापासून एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेक व्यक्तींची बालपणीची मैत्री ही काही दिवसानंतर तुटून जाते. मात्र सुहाना आणि अनन्या या दोघींमधली ही मैत्री अद्यापही घट्ट आहे. या दोन्ही अनेक वेळा एकमेकींना भेटत असतात.

एकमेकींबरोबर कॉलिटी टाइम्स स्पेंड करतात. तसेच दोघी सोशल मीडियावर सतत एकमेकींबरोबरचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोवर चाहते तुफान लाइफ चा वर्षाव करतात. तसेच अनन्या नेहमीच सुहानाने शेअर केलेल्या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट करत असते. सुहाना देखील आणण्याच्या फोटो वरती प्रतिक्रिया देते. या दोघींमध्ये असलेली घट्ट मैत्री सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळाली आहे.

अनन्या सध्या बॉलीवूडवर राज्य करत आहे. आतापर्यंत तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनन्याही सुहाना पेक्षा वयाने मोठी आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तिने लवकरच शिरकत केली. नुकतीच ती दीपिका पदुकोण या अभिनेत्री बरोबर ‘गेहराईया’ या चित्रपटात दिसली होती. सुहाना देखील बॉलीवूडमध्ये येण्याच्या तयारीत आहे. लवकरच ती बिग बजेट चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सध्या करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो चांगला चर्चेत आहे. यशो मध्ये सुहाना खान देखील येणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र करणने ती अद्याप स्टार कीड असल्याने या शोमध्ये येऊ शकत नाही असं स्पष्ट केलं होतं. कारण या शोमध्ये सर्व स्टार शामिल होतात. सुहाना अजून शिक्षण घेत आहे आणि अद्याप तिने कोणत्याही चित्रपटात काम केलेली नाही त्यामुळे येऊ शकली नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *