गाईला वाचविण्यासाठी चौघांची धरपड, अखेर त्या ४ तरुणांचा मृत्यू

चंद्रपूर | अपघाग्रस्त होऊन निधन होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. सतत रस्त्यावरील दुर्घटनेत अनेक व्यक्तींचे निधन होत आहे. अशात आता काळजाला चटका लावणारा प्रकार घातला आहे.

३३ कोटी देव हे गाईमध्ये असतात असं म्हटलं जातं. अशात याच गाईचा जीव वाचवत असताना चार व्यक्तींना मृत्यूने घेरले आहे. रस्त्यात गाडी चालवत असताना एक गायमध्ये बसली होती.

गाईला वाचावण्याचा प्रयत्न केल्याने चार जणांना आपल्या आयुष्याला मुकावे लागले आहे. ही घटना चंद्रपूर येथे घडली आहे. यात एक जण जखमी असून चार व्यक्ती मृत पावल्या आहेत.

चंद्रपूर येथील सावली तालुक्यातील किसा नगर येथे हा भयंकर अपघात झाला. समोर आलेल्या माहितीनुसार पंकज बागडे हे गडचिरोली येथून आपल्या मित्राकडे आले होते. विहीरगाव येथे अनूप ताडूलवार यांच्याकडे ते आपली बलेरो गाडी घेऊन आले होते. तिथून ते आपल्या मित्राला घेऊन चंद्रपूर येथे रवाना झाले. त्यांना डीजेचे समान घायचे होते.

समान घेऊन त्यांनी पुन्हा गाडी घरी फिरवली. यावेळी रस्त्यात एक गाय बसली होती. या गायीला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यावेळी स्टेअरिंगची राळ त्यांच्या हातात आली. तसेच त्यांची गाडी एका मोठ्या ट्रकवर आदळली. यात चार जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी आहे.

सावली येथील ठाणेदार आशिष बोरकर यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तेथील अपघात पाहता सर्वांना रुग्णालयात दाखल केले. यात सुरेंद्र हरेंद्र मसराम – २३, हा व्यक्ती गंभीर जखमी आहे. तर यातील मृतांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

घटनेत अनुप रमेश ताडूलवार – ३५, (पत्ता -विहीरगाव,महेश्ववरी), अनुप ताडूलवार – २४,( पत्ता – विहीरगाव,) मनोज अजय तीर्थगिरीवार – २९,( पत्ता – ताडगाव ) आणि पंकज किशोर बागडे – २६, ( पत्ता – गडचिरोली) यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेने गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे. सर्व जण या चार व्यक्तींना श्रद्धांजली वाहत आहेत. तसेच पोलिसांनी या घटनेत अधिक तपास सुरू ठेवला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *