आशीकी चित्रपटातील या अभिनेत्रीवर आलीय खुपचं वाईट वेळ; जगण्यासाठी करतेय हे काम, ओळखनही झालंय कठीण

मुंबई | बॉलीवूड हे एक असे ठिकाण आहे जिथे एका रात्रीत चित्रपट हिट झाल्याने कलाकारांचे आयुष्य बदलून जाते. चित्रपट गाजला की हे कलाकार सातव्या आसमंतवर पोहचतात. मात्र हे सर्व नशिबाचे खेळ आहेत. यात जर लगातार २ ते ३ चित्रपट फ्लॉप झाले तर हेच कलाकार पार जमिनीवर येऊन आफटतात. असे अनेक कलाकारांबरोबर आजवर घडले आहे. ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून सातवे आस्मना गाठले खूप प्रसिद्ध झाले मात्र नंतरचे चित्रपट फ्लॉप झाल्याने त्यांना आता कुणीही ओळखत नाही.

आज आपण नव्वदच्या दशकात आलेला चित्रपट आशिकीमधील अभिनेत्री विषयी बोलत आहोत. या अभिनेत्रीचे नाव आहे अनु अग्रवाल. आशिकी या चित्रपटात ती पहिल्यांदा दिसली. या चित्रपटाची कथा आणि गाणी यांनी आजही चाहत्यांच्या मनावर पकड मजबूत बनवली आहे. त्या काळात ही अभिनेत्री खूप गाजली. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. मात्र तिचे नंतरचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. आज ही अभिनेत्री खूप दूर एकटीने आयुष्य जगत आहे. या बातमीतून ती आता नेमकी काय करते हे जाणून घेऊ.

साल १९९९ मध्ये अनु एकदा रात्रीच्या वेळी तिच्या कार मधून घरी चालली होती. त्याचं वेळी तिचा मोठा अपघात झाला. या अपघातात तिला खुप मोठी दुखापत झाली. तिची यादाश गेली तसेच ती बरेच वर्ष कोमात होती. आता ती यातून सावरली आहे. मात्र तिची चमक आणि प्रसिध्दी पूर्णतः मिटली आहे. त्यामुळे तिला चित्रपटांमध्ये एका आईचा रोल मिळणं देखील मुश्किल झाले आहे. आता तिच्या चेहऱ्यावर आधी सारखी चमक राहिली नाही.

अनु आता ४८ वर्षांची झाली आहे. मात्र तिने अद्याप लग्न केले नाही. तिचे आयुष्य खूप बेकार झाले आहे. तिला आता तुम्ही पाहिले तर तुम्हाला तिला ओळखता देखील येणार नाही. ती आता एकटीनेच तिचे आयुष्य जगत आहे. साल २०१५ मध्ये तिने तिची एक आत्मकथा लिहिली होती. यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील संघर्ष, एकटेपणा आणि सर्व अडचणी सांगितल्या. आता ती बिहारमध्ये आपल्या गावी राहते. इथे ती योगाचे क्लास घेते. यातूनच ती तिचा उदरनिर्वाह करत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *