प्रेग्नेंसीचा सपाटा! करीना नंतर आता ऐश्वर्या दुसऱ्यांदा देणार बाळाला जन्म

मुंबई | ऐश्वर्या राय बच्चन ही अभिनेत्री लग्न झाल्यानंतर सोशल मीडियापासून दूर गेली आहे. ती तिच्या सोशल मीडिया पेजवर खूप क्वचित ॲक्टिव असते. अशात ऐश्वर्या आराध्या आणि अभिषेक हे तिघे नुकतेच एअरपोर्टवर स्पॉट झाले. या तिघांना पाहून आता आणखीन एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

यावेळी आराध्याने सफेद रंगाचे कपडे घातले होते. तर अभिषेक गुलाबी रंगाच्या सूटमध्ये होता. तसच ऐश्वर्याने यावेळी एक काळया रंगाचा टॉप घालून त्यावर एक मोठा लांबलचक गुलाबी रंगाचा टॉप घातला आहे. तिच्या या लूज कपड्यांवरून आता वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. अनेक जण म्हणत आहेत की ती प्रेग्नेंट आहे.

ऐश्वर्याने जो ड्रेस घातला आहे त्यामध्ये तिचा बेबी बंप दिसतो आहे. त्यामुळे अनेक जण ती प्रेग्नेंट असल्याचं म्हणत आहेत. नुकतेच ते स्टार कपल न्यूयॉर्क येथे सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी तिथे खूप धमाल मस्ती केली. त्यांचे तेथील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशात आता न्यूयॉर्क वरून येत असताना त्यांना एअरपोर्टवर पाहिले गेले.

अशात तिच्या या ड्रेसमुळे तिला ट्रोल देखील केलं जात आहे. अनेक जण म्हणत आहेत की, ती अरेबियातून परत आली आहे का? तर काही जण तिला प्रेग्नेंट म्हणत आहेत. नुकतच अभिनेत्री करीना कपूर विषयी देखील ती प्रेग्नेंट असल्याची अफवा पसरवली गेली होती. अशात आता ऐश्वर्याने बद्दल सुरू आलेल्या या चर्चेत किती तथ्य आहे हे ती स्वतः च सांगू शकेल.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *