आधी पोटच्या दोन मुलांचा जीव घेतला नंतर स्वतः देखील विश घेतले; पत्नी पळून गेल्याने पतीने संपवले संपूर्ण कुटुंब

छत्तीसगड | छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे काळीज सुन्न करणारी घटना घडली आहे. या घटनेने सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरले आहे. एकाच वडिलांनी आपल्या दोन मुलांची हत्या केली आहे. तसेच त्या व्यक्तीने नंतर वीश घेऊन स्वतःचे जीवन देखील संपवले आहे. या घटनेमुळे परिसरातील सर्व व्यक्ती हळहळ व्यक्त करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार सदर व्यक्ती एका खासगी कंपनीत काम करत होता. तो गुरुवारी घरी आला त्यानंतर त्याने आपल्या दोन्ही मुलींची हत्या केली. अमित आणि रागिणी अशी हत्या झालेल्या मुलांची नावे आहेत. अमित हा ९ वर्षांचा होता तर रागिणी फक्त ६ वर्षांची होती. त्यानंतर त्यांचे वडील रामेश्वर साहू वय वर्ष ३०, याने देखील विश पिऊन आत्महत्या केली. रविवारी या घटनेचा उलगडा झाला. कारण दोन दिवस झाले त्यांच्या घरातून कोणीच बाहेर आले नाही.

तसेच रविवारी त्यांच्या घरातून खराब वास येऊ लागला. शेजाऱ्यांना काहीतरी चुकीचं घडलं आहे याचा अंदाज आल्याने त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस घटनस्थळी येताच त्यांनी घराचा दरवाजा तोडला त्यावेळी हे तिघे जण तिथे मृत अवस्थेत आढळले. दोन दिवस झाल्याने या तिघांचे शव सडले होते आणि खूप वास येत होता.

पोलिसांनी त्यांचे शव ताब्यात घेऊन श्रवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की, रामेश्वरची पत्नी त्याच्या भावाबरोबर म्हणजे तिच्या दिरा बरोबर पळून गेली होती. आपली पत्नी आपल्याच भावा बरोबर पळून गेली आहे. तेही आपल्याला दोन मुलं झाल्या नंतर हे दुःख त्याला पाचले नाही. त्यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. मात्र यामुळे निष्पाप दोन मुलांचा देखील जीव गेला.

मात्र या बाबत अजून ठोस पुरावे मिळालेले नाहीत. कारण त्यांनी आत्महत्या करताना कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र अशा घटना घडल्यास सदर व्यक्तींना खूप अपमानास्पद जीवन जगावे लागते. पत्नी पळून जाणे यापेक्षा वाईट दुःख कोणते. यामुळे कोणतीही व्यक्ती खचून जाईल. अनेक व्यक्ती दुसऱ्यांचा विचार न करता आपल्याला जे चांगल वाटेल तेच करत असतात. या घटनेत देखील सध्या तरी असेच दिसत आहे की, या तिघांच्या मृत्युला मुलांची आईच जबाबदार आहे.

धत्तीसगड येथे दिवसेंदिवस अशा घटना वाढत चालल्या आहेत. या शहरात एकाच वर्षात अनेक व्यक्तींनी सामूहिक रीत्या आपले जीवन संपवले आहे. काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील २० व्यक्तींनी एकत्र आपले जीवन संपवले होते. तर रायपूर येथील चतुर्थ श्रेणी एका कर्मचाऱ्याने देखील अशा पद्धतीने आपले जीवन संपवले. अशीच घटना दुर्ग या ठिकाणी देखील घडली होती.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *