अखेर ९ वर्षांनी खिशात फोटो घेऊन फिरणाऱ्या शिंदे यांना सापडली ती अपहरण झालेली मुलगी….

मुंबई| अंधेरी पश्चिम येथील कर्नाटक मिलन वेल्फेअर सोसायटीमध्ये राहणारी एक लहान मुलगी बेपत्ता झाली होती. मात्र आता तब्बल नऊ वर्षांनी पोलिसांना तिला शिधून काढण्यात यश आले आहे. पूजा गौड असं या मुलीचं नाव आहे. जानेवारी, २०१३मध्ये शाळेसाठी घराबाहेर पडलेली पूजा पून्हा घरी परतलीच नाही. शाळेमध्ये मैत्रिणींकडे चौकशी करूनही पूजाचा काहीच पत्ता लागत नसल्याने त्याच्या पालकांनी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली.

या पोलीस ठाण्यात १६६ नंबरवर तिचे नाव नोंदवले गेले. यातील बाकीच्या बेपत्ता व्यक्तींना शोधण्यात पोलिसांना आधीच यश आले होते. मात्र पूजा काही सापडत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण शहर पिंजून काढले. यावेळी घरच्या व्यक्तीची देखील चौकशी झाली. ही केस पोलीस अधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे होती.

ते नुकतेच सेवा निवृत्त झाले. मात्र त्यांनी पूजाचा शोध थांबवला नव्हता. घराघरात जाऊन त्यांनी तिची चौकशी केली. ते गावी गेल्यावर देखील तिचा विचार करत होते. तसेच जेव्हा जेव्हा ते मुंबईमध्ये यायचे तेव्हा तेव्हा ते पूजाला शिधायचे. त्यांना काही करून तिला शोधून काढायचे होते. मात्र काही केल्या हा तिढा सुटत नव्हता.

अशात त्यांनी पूजाच्या भावाची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले होते की, मी आणि पूजा एकत्र शाळेत आलो होतो. त्यावेळी बाबांनी आम्हाला १० रुपये दिले होते. शाळेत आल्यावर ती लगेच माझ्याकडे ५ रुपये मागू लगली. मी तिला म्हणालो की, शाळा सुटल्यावर देईल. यावर ती काहीच बोलली नाही. नंतर मी वर्गात निघून गेलो. शाळा सुटली तेव्हा ती मला भेटली नाही.

शिंदे मुंबईमध्ये आले होते. तेव्हा त्यांना एक खबर मिळाली की, विलेपार्ले येथे एका झोपडीत एक मुलगी राहते. तिचे आई वडील तिला नीट सांभाळत नाहीत. इतर आई वडीलापेक्षा हे थोडे वेगळे आहेत असे त्यांना समजले. त्यावेळी त्या घरात त्यांना पूजा सापडली.

खरं तर हॅरी डिसोजा या व्यक्तीने तिचे अपहरण घडवून आणले होते. डिसोजा दाम्पत्याला आपत्य नव्हते. त्यांना पूजा आवडली होती. त्यामुळे त्यांनी तिला आइस्क्रीम खायला देत तिचे अपहरण केले. त्यांनी पूजाचे नाव बदलून अँनी ठेवले होते. काही वर्षांनी त्यांना एक बाळ झाले. त्यामुळे नंतर त्यांनी पूजाला त्रास द्यायला सुरुवात केली. तिचा त्यांनी छळ केला. तिला जेवायला देत नव्हते. तसेच तिला कामाला जाण्यास सांगून तिने आणलेले सर्व पैसे स्वतः कडे ठेवत होते. शिंदे त्यांनी सादर गुन्हेगारांना अटक केली असून आता पूजा तिच्या खऱ्या आई बाबांकडे आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *