पीएम मोदीच्या निर्मात्यांना जि’वे मा’र’ण्याची आली धमकी, सिद्धू सिंग मुसेवाला प्रमाणे करणार ह’त्या …

पुणे | प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू सिंग मुसेवाला याला भर रस्त्यात गो’ळा घालून त्याची ह’त्या करण्यात आली. त्यानंतर काही अभिनेत्यांना धमकीचे फोन आले. काही दिवसांपूर्वीच मनू पंजाबी या अभिनेत्याला धमकीचा फोन आला होता. त्याच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास त्याची देखील सिद्धू सिंग उसेवाला प्रमाणे ह’त्या केली जाणार असा एक मेल त्याला आला होता. यावेळी त्याने तात्काळ तक्रार दाखल करत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र आता या घटनेची पुनरावृत्ती होत असताना दिसत आहे. बॉलीवूड मधील एका दिग्दर्शकाला असाच धमकीचा एक फोन आला आहे. तसेच या धमकीचा त्याला मेसेज देखील करण्यात आला आहे.

बॉलीवूडचे चित्रपट निर्माते संदीप सिंह यांना सिद्धू सिंग मुसेवाला प्रमाणे ह’त्या केली जाईल असा मेसेज आला आहे. चार जुलै रोजी त्यांना हा मेसेज आला होता. त्यामुळे त्यांनी तात्काळ आंबोली पोलीस ठाण्यात सदर प्रकाराबाबत तक्रार दाखल केली आहे. अशात आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांचे एक वेगळं शोध पथक देखील सदर गुन्हेगाराचा शोध घेत आहेत. संदीप सिंह यांना आलेल्या मेसेजला ट्रॅक करून हा तपास सुरू आहे. लवकरच आरोपी गजाड होईल अशी शाश्वती पोलिसांनी दिली आहे. तसेच संदीप यांना पोलीस प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. संदीप सिंह हे अंधेरी पश्चिम येथील वारी देसाई रोड येथे राहतात. त्यामुळे त्यांनी धमकी मिळतात जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्या धमकी विषयी सांगितले की, ” ज्या प्रकारे लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची ह’त्या करण्यात आली, त्याच पद्धतीने त्यालाही मा’रले जाईल.” अशा आशयाची धमकी निर्मात्याला आली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संदीप सिंग यांच्या तक्रारीच्या आधारे बुधवारी अंधेरीच्या उपनगरातील अंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली. संदीप सिंग यांना सोमवारी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर जी’वे मार’ण्याच्या धमक्या आल्या. धमकी देताना अज्ञात व्यक्तीने संदीप सिंगयांना पंजाबी गायक सिद्धू मूसवालाप्रमाणे मारले जाईल, असे म्हटले आहे.

सदर घटने बाबत आंबोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आम्ही निर्माता संदीप सिंग यांच्या तक्रारीवरून गु’न्हा दाखल केला आहे आणि फेसबुक वापरकर्त्याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. तक्रारदाराला आरोपीची माहिती नाही. धमकी देण्यामागचा हेतू काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे. तपास सुरू आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.

अशात संदीप सिंग यांनी आता पर्यंत भूमी, सरबजीत, पीएम मोदी, झुंड अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. संदीप यांचा स्वतःच्या मालकीचा लिजेंड नावाचा एक स्टुडिओ आहे. यामध्ये आतापर्यंत त्यांनी जो मेरी कोम, अलिगड, सरबजीत, झुंड आणि पीएम मोदी हे चित्रपट बनवले आहेत. तसेच लवकरच ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. पोलिसांनी या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर देखील शोध तपास सुरू केला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *