चित्रपटसृष्टी हादरली! दिग्गज अभिनेत्याचं निधन, बच्चन यांनी वाहिली श्रद्धांजली

पुणे:गेल्या काही दिवसांपासून भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहे. लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी यांच्या निधनाची बातमी ताजी असताना एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे.

साऊथ चित्रपट सृष्टीत सक्रिय असलेले अभिनेते ताटिनेनी रामा राव यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ताटिनेनी रामा राव हे साऊथ चित्रपट सृष्टीतील वरिष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जायचे.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करून देखील त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा आली नाही. 20 एप्रिल रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे.

ताटिनेनी रामा राव यांनी जीवनधारा, संसार, आंधा काणून, लोक परलोक, बुलंदी अशा दिग्गज चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. ते हिंदी चित्रपट सृष्टीत चांगलेच सक्रिय होते. त्यांचां लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे.

 

ताटिनेनी रामा राव हे एक लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून देखील ओळखले जायचे. त्यांनी दोस्ती दुष्मनी, आखरी रस्ता, अरुल, युथ अशा दिग्गज चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *