चित्रपटसृष्टी हादरली! दिग्गज अभिनेत्याचे निधन; 150हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका Film industry shook! Legendary actor passes away; He acted in more than 150 films

२०२२ हे वर्ष बॉलिवूड सिनेसृष्टीसाठी अतिशय वाईट ठरले आहे. कधी कोणत्या अभिनेत्री गंभीर आजाराशी झुंज देत आहे तर कधी कोणत्याचे अभिनेत्याचे निधन होत आहे. तर एकीकडे अक्षय कुमार आणि आमिर खान सारख्या सुपरस्टार्सचे अनेक प्रसिद्ध चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाले आहेत.

 

जणू काही बॉलीवूडला नजरच लागली आहे. तसेच बॉलिवूडमधून एकामागोमाग एक वाईट बातम्या समोर येत आहे आणि बॉलिवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्यांचेही निधन झाल्याचे समोर येत आहे अशात बॉलिवूड मधून अजून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे.

 

दरम्यान, प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांचे शनिवारी निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीने बॉलिवूड सोबत चाहत्यांना देखील रडवले आहे. कारण अभिनेते जितेंद्र हे बॉलिवूडचे अतिशय प्रसिद्ध जेष्ठ अभिनेते होते ते सर्व प्रेक्षकांचे अतिशय खळखळून मनोरंजन करायचे.

 

६५ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते शेवटचे TVF च्या प्रसिद्ध वेब सीरिज ट्रिपलिंगमध्ये दिसले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यापासून त्यांचे चाहते आणि जवळचे मित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

 

दरम्यान, प्रसिद्ध अभिनेते आणि जितेंद्रचे सर्वात जवळचे मित्र संजय मिश्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून त्यांचा एक व्हिडिओ शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

जितेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताने संजयला खूप दु:ख झाले आहे आणि तुटलेल्या मनाने त्याने लिहिले आहे की, ”जीतू भाई तुम्ही असते तर मिश्रा हे बोलले असते, कधी कधी असे होते की नाव मोबाईलमध्ये राहते पण व्यक्ती नेटवर्कच्या बाहेर जाते. तू आता या जगातून निघून गेला आहेस पण तू माझ्या हृदयात आणि मनात कायमची आठवण राहशील.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *