चित्रपसृष्टी हादरली! प्रसिध्द बालकलाकाराच्या वडिलांचे निधन; देशात शोककळा

मुंबई | साऊथ इंडस्ट्री दिवसेंदिवस प्रसिद्ध होत असतानाच दुसरीकडे एकामागून एक धक्कादायक बातम्या ऐकायला मिळत आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री अंबिका रावनंतर आता अभिनेत्री मीनाचे पती विद्यासागर यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. मीना यांचे पती विद्यासागर हे अनेक दिवसांपासून फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत होते. तसेच त्यांना कोरोनाची देखील लागण झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक बनली आणि बुधवारी ( 27 जुलै) सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना हिच्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दाक्षिणात्य अभिनेता सरथकुमार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर विद्यासागर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूतीही देखील व्यक्त केली आहे. या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. तसेच कलाकारांपासून सामान्य व्यक्तींपर्यंत सगळेच हळहळ व्यक्त करत आहेत. कारण मीना यांना एक लहान मुलगी आहे. तिची संपूर्ण जबाबदारी आता मीना यांना घ्यावी लागेल. अशात मीना यांच्या प्रमाणे त्यांची मुलगी देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.

विद्यासागर यांचे मंगळवारी रात्री निधन झाले आणि बुधवारी बसंत नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अभिनेते रजनीकांत, सरथ कुमार, मन्सूर अली खान आणि राज्य सरकारचे उच्च अधिकारी जे राधाकृष्णन यांच्यासह ख्यातनाम व्यक्तींनी त्यांना पुष्पहार अर्पण केले आणि मीना यांच्या विषयी सहानुभूती व्यक्त केला. अभिनेत्री खुशबू सुंदरसह अनेकांनी सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या पतीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

पत्रकारांशी बोलताना मंत्री सुब्रमण्यम म्हणाले की, “विद्यासागर यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता आणि त्यावेळी ते घरी ऑक्सिजन सपोर्टवर होते. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि ते सुमारे सहा महिने रुग्णालयात होते. त्यांच्या फुफ्फुसात समस्या होती. विद्यासागर यांचा मृत्यू कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेला नाही. मंत्र्याच्या म्हणण्यानुसार, 15 दिवसांपूर्वी विद्यासागर यांना पाहण्यासाठी ते रुग्णालयात गेले तेव्हा विद्यासागर बेशुद्ध पडले होते.”

पुढे सुब्रमण्यम म्हणाले की, “मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सूचनेनंतर तामिळनाडू सरकारने अभिनेत्रीच्या पतीसाठी योग्य ‘देणगीदार’ शोधण्यासाठी प्रयत्न केले आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकसह देशातील अनेक भागांतील अधिकाऱ्यांनाही यासंदर्भात विनंती करण्यात आली. ते म्हणाले, “रक्तगट शोधून रक्तदात्याचे त्यांना द्यायला हवे होते, पण तसे होऊ शकले नाही.”

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *