चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन; 450हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका, मोलकरणी ते अभिनेत्री असा होता प्रवास

मुंबई | दाक्षिणात्य सिनेमाइंडस्ट्रीतील नायिकांच्या यादीत सिल्क स्मिता हे नाव प्रसिध्द झालं खरं पण सिल्क स्मिता जितकी हॉट होती तितकाच तिचा या क्षेत्रातील प्रवासही हॉट आहे. सिल्क स्मिताच्या आयुष्यावर बेतलेला डर्टी पिक्चर हा सिनेमा खूप काही सांगून जातो.

पण तुम्हाला हे माहित आहे का की सिल्क स्मिता रूपेरी पड्द्यावर येण्याआधी एक मोलकरीण म्हणून काम करत होती. पण अभिनयक्षेत्रात येऊन तिने साडेचारशे सिनेमे केले. प्रचंड संघर्ष आणि कटू अनुभवांनी भरलेलं आयुष्य जगणाऱ्या सिल्क स्मिताचा अंतही खूप करूण पध्दतीने झाला ही तिच्या चाहत्यांसाठी दु:खाची गोष्ट आहे.

सिल्क स्मिताने वयाच्या १७ वर्षी तिच्या अभिनयाला सुरूवात केली. त्या आधी घरोघरी मोलकरणीचे काम ती करत होती. फिल्मी इंडस्ट्रीमध्ये सिल्क स्मिता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव होतं विजयालक्ष्मी वदलापती. पण तिच्या पडद्यावरच्या सेक्सी इमेजने तिला सिल्क स्मिता हे नाव दिलं.

सिल्क स्मिता एका प्रख्यात अभिनेत्रीच्या घरी घरकाम करत होती. तिला छान दिसायला खूप आवडायचं. त्यातूनच मी मेकअप करायला शिकली आणि पुढे मेकअप आर्टिस्ट बनली. एकदा एक निर्माता त्या अभिनेत्रीच्या घरी आला असता त्याची नजर सिल्क स्मितावर पडली. त्यावेळी गप्पांमध्ये त्या अभिनेत्रीने निर्मात्याला स्मिताची ओळख करून देताना असं सांगितलं की तिला तुमच्या कारमध्ये बसण्याची इच्छा आहे. स्मितानेही दुजोरा दिला.

पुढे सिल्क स्मिता सिनेमांमध्ये छोटी मोठी कामं करू लागली. या क्षेत्रात टिकण्यासाठी काही चुकीच्या गोष्टी करण्याचे क्षण तिच्या आयुष्यात आले आणि ती करत गेली. १९७० ते ९० या वीस वर्षात सिल्क स्मिताची जादू साउथ सिनेमा इंडस्ट्रीत होती. न चालणाऱ्या सिनेमात फक्त स्मिता एका गाण्यावर जरी थिरकली तरी ते सिनेमे सुपरहिट व्हायचे. बॉक्स ऑफीसवर गर्दी खेचणारा ती एक हुकमी एक्का बनली.

पडद्यावर तिची इमेज सेक्सी अभिनेत्री बनली त्यामुळे तिला येणाऱ्या भूमिकाही ग्लॅमरस होत्या. हॉट अभिनेत्री ही तिची इमेज बनली आणि त्यामध्येच ती शेवटपर्यंत अडकली. तिची इच्छा असूनही या इमेजमधून तिला बाहेर पडता आले नाही. अनेकदा तिचा उल्लेख सॉफ्ट पॉर्न असा केला पण तिने मात्र त्याकडे दुर्लक्षच केलं.

२०११ मध्ये सिल्कस्मिताच्या आयुष्यावर डर्टी पिक्चर हा सिनेमा आला. या सिनेमात सिल्क स्मिताची बायोग्राफी प्रेक्षकांना पाहता आली. अवघ्या २५ कोटी रूपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर ८३ कोटी रूपयांची कमाई केली. या सिनेमात विद्या बालन हिने सिल्क स्मिताची भूमिका केली होती, उलाला उलाला या गाण्याने धमाल उडवली होती.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *