चित्रपटसृष्टी हादरली! प्रियांका चोप्रा सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीचे निधन; अभिनय क्षेत्रात शोककळा

दिल्ली | हॉलीवुड मधून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. अनादर द वर्ल्ड या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऍने हेच हीचा मृत्यू झाला आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी या अभिनेत्रीचे निधन झाले. तिच्या निधनाने सर्व जण भावूक झाले आहेत. खूप लवकरच तिने या जगाचा निरोप घेतला असल्याने चाहते तसेच बॉलीवुडमधील देखील अनेक कलाकार तिच्यासाठी दुःख व्यक्त करत आहेत.

लॉस एंजेलिस येथे या अभिनेत्रीच्या गाडीचा गंभीर अपघात झाला होता. तिची गाडी एका इमारतीला धडकली होती. यात गाडीने मोठा पेट घेतला होता. यात तिच्या मेंदूला खूप इजा झाली. अग्निशमन दलाची गाडी यावेळी तात्काळ घटनास्थळी पोहोचली होती. त्यांनी अभिनेत्रीला यातून कसेबसे बाहेर काढले. तेव्हा पासून तिच्यावर उपचार सुरू होते. गेल्या ६ दिवसांपासून सुरू असलेले हे उपचार आता संपले आहेत.

या अभिनेत्रीच्या निधनाने संपूर्ण हॉलीवुडवर शोककाळा पसरली आहे. अशात आता काही कलाकारांनी याविषयी पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्राने एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, ” तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना माझ्या सद्भावना. तुझ्यासारख्या मोठ्या अभिनेत्री बरोबर मला काम करायला मिळाले हे मी माझे भाग्य मानते. तू एक सुंदर आणि अद्भुत अभिनेत्री होतीस. माझ्या हृदयात तुझ्यासाठी कायम जागा असेल. तुझ्या आत्म्याला शांती लाभो.”

५ ऑगस्ट २०२२ रोजी अभिनेत्रीचा गंभीर अपघात झाला. लॉस एंजेलिसमधील मार व्हिस्टा, वॉलग्रोव्ह एव्हेन्यू येथील एका इमारतीवर अभिनेत्रीची कार आदळली होती. यामध्ये तिच्या कारला जेव्हा आग लागली तेव्हा संपूर्ण इमारतीला सुद्धा आग लागली होती. सुमारे एक तास शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर अग्निशमनदलाला ही आग विझवण्यास यश आले. मिळालेल्या माहितीनुसार कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार अभिनेत्रीला मृत घोषित करण्यात आलेले आहे.

तिच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, तिच्या मेंदूला खूप जास्त मार लागलेला आहे. तसेच गेले सहा दिवस तिला आम्ही लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवले होते. मात्र आता आम्ही लाईफ सपोर्ट सिस्टीम काढत आहोत. तसेच तिचे अवयव देखील दान केले जाणार आहेत. अभिनेत्रीच्या दुःखद निधनाने चाहते फार भाऊक झाले आहेत. तिचे कुटुंबीय देखील या दुखःमुळे पूर्णता खचून गेले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *