पंधरा दिवसांपूर्वी आईच निधन आणि पंधरा दिवसानंतर मुलाचं अपघातात निधन; कुटुंबावर शोककळा

गंगापूर | टेम्पोने दुचाकीला धडक देऊन एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. हा मृत्यू गंगापूर शहरातील महाराणा प्रताप या चौकात आज सकाळी सात वाजल्याच्या सुमारास झाला. शेख मुसा शेख निजाम अस नाव असून वय वर्षे (36) अपघाती मृत्य झालेल्या तरुणाच नाव आहे.

खुलताबाद तालुक्यातील देवळांना येथून आज पहाटे शेख मुसा निजाम हा आपल्या सहकारी वशिम पठाण वय वर्षे (22) असून गंगापुर येथून एम.एच.20 ए. सी. 4245 या नंबरच्या वाहनवरून येत होते. सकाळी सात वजल्याच्या सुमारास गंगापूर शहरातील महाराणा प्रताप चौकात वळण घेत असताना वैजापूरहून औरंगाबादकडे जाणाऱ्या टेम्पोने एम.एच 14 ई. एम. 9577 नंबर असलेल्या वाहनान जोराची धडक दिली.

निजामच्या मृत्यूच्या 15 दिवस आधी त्याच्या आईच निधन – यात दोघेही जबर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाती रुग्णालयात दाखल केलं. घाटी रुग्णालयात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शेख मुसा शेख निजामचा मृत्यू झाला. पाश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा संसार आहे. निजामच्या मृत्यूच्या 15 दिवसाआधी त्याच्या आईच निधन झालं आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *