उपचारांसाठी पैसे नसल्याने प्रसिध्द दिग्दर्शकाच्या पत्नीचे निधन; चित्रपटसृष्टी हादरली

मुंबई | बॉलीवुड सिनेसृष्टी आपल्या चित्रपटांसाठी जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच इतर कामांसाठी बदनाम देखील आहे. इथे अनेक गैरप्रकार घडत असतात. अनेक मोठमोठ्या चित्रपटांची निर्मिती करणारे तसेच आपल्या एकाच चित्रपटातून मोठ्या प्रसिद्धीस होतात आलेले अनेक कलाकार जेव्हा बॉलीवूडच्या झगमगीपासून थोडे दूर जातात तेव्हा त्यांना कोणीच विचारत नाही.

त्यांची प्रसिद्धी कमी होत जाते आणि त्यानंतर बॉलीवूडमधील कोणताही कलाकार किंवा अन्य कोणताही दिग्दर्शक त्यांना चौकशीचा एक फोन देखील करत नाही. यामध्ये काही दिग्गज व्यक्तींवरती आर्थिक संकट देखील ओढवते. यावेळी ते मदत देखील मागतात मात्र त्यांच्या मदतीसाठी कोणीच धावून येत नाही.

प्रसिद्धी संपल्यानंतर पैसा देखील संपतो यामध्ये अनेक दिग्दर्शकांवरती देखील मोठे आर्थिक संकट उभे राहते. मात्र यावेळी त्यांना कोणीच मदत करत नाही. आर्थिक संकट आल्यामुळे अनेक कलाकारांचे मोठे नुकसान होते. बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेते रजा मुरादे यांनी बॉलीवूडच्या या परंपरेवर अनेकदा टीका केली आहे. त्यांनी नेहमीच बॉलीवूडने डावलेल्या कलाकारांविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे.

अशात बॉलीवूड मधील एका दिग्गज दिग्दर्शकावरती मोठे आर्थिक संकट ओढावल्याने त्याला आपल्या पत्नीपासून मुकावे लागले आहे. या दिग्दर्शकाने डिस्को डान्सर या चित्रपटातून मिथुन चक्रवर्ती यांना सिनेसृष्टीमध्ये पहिला ब्रेक दिला. त्यांचा हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्यापुढे वेगवेगळ्या आणि मोठ्या चित्रपटांची रांग लागली. यानंतर अनेक दिग्दर्शकांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याबरोबर चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली.

मिथुन चक्रवर्ती यांना सुपरस्टार बनवणारे ते दिग्दर्शक मात्र आता मोठ्या दुःखात आहेत. बी सुभाष असे या दिग्दर्शकांचे नाव आहे. 80 आणि 90 च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. यामधून त्यांनी प्रचंड प्रसिद्धी आणि पैसा देखील कमावला. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी तलोदमा यांना किडनीचा एक आजार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयात दाखल केले गेले. इथे त्यांच्या वरती उपचार सुरू होते. काही काळानंतर त्या उपचार घेऊन घरी देखील परतल्या.

मात्र त्यांची किडनीची समस्या पूर्णतः संपलेली नव्हती. डॉक्टरांनी आणखीन एक ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले होते. या काळात पत्नीच्या उपचारांसाठी त्यांच्याकडे असलेली सर्व जमापुंजी संपली होती. त्यामुळे त्यांनी बॉलीवूड कडे अनेकदा मदत देखील मागितली. मात्र त्यांच्या मदतीसाठी कोणीच पुढे आले नाही. बी सुभाष हे कोण आहेत अशा पद्धतीने अनेकांनी प्रतिक्रिया दिली. या प्रसिद्ध दिग्दर्शकावर मोठे आर्थिक संकट आल्याने पत्नीच्या उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते.

शेवटच्या दिवसांमध्ये त्यांच्या पत्नीला पुन्हा एकदा कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र जवळ काहीच पैसा नसल्याने त्यांच्यावरती योग्य पद्धतीने उपचार होऊ शकला नाही. त्यांच्या पत्नीची प्राणज्योत मालवली. एवढी प्रसिद्ध मिळवूनही बॉलीवूडने त्यांना काहीच मदत केली नाही. यामुळे ते खूप दुःखी आहेत. तसेच आपल्या पत्नीच्या निधनामुळे त्यांच्यावरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *