प्रसिद्ध विनोदी अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

मुंबई | मराठी मनोरंजन विश्वात अनेक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नेहमीच आपल्या अभिनयाच्या आविष्काराने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा राहत्या घरी त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीमध्ये दुःखाची लाट उसळली आहे.

मराठी सिनेसृष्टीत त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आपलं नाव कोरलं. त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी लाखोंचा चाहता वर्ग स्वतःकडे खेचून घेतला. त्यांच्या आकस्मित निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वातील सर्वच दिग्गज मंडळी सोशल मीडिया मार्फत त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत आहेत.

मोरूची मावशी या नाटकातून ते घराघरात पोहोचले. या नाटकामधूनच त्यांची प्रसिद्धी सागराएवढी मोठी झाली. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट यशस्वी ठरवले. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि नवरा माझा नवसाचा या दोन्हीही चित्रपटांतील त्यांच्या भूमिका नेहमीच वाखरण्याजोग्या राहिल्या आहेत. अभिनय विश्वातील सर्वच व्यक्ती त्यांना आदराने संबोधनाच्या. प्रदीप पटवर्धन महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये देखील सुरुवातीला झळकले. यावेळी त्यांनी त्यांच्या विनोदी अभिनायची जादू सबंद महाराष्ट्रावर केली.

आपल्या कारकीर्द त्यांनी आजवर अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र प्रत्येक भूमिकेत त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. त्यांच्या अभिनयाच्या कारकीर्दीत त्यांनी ‘1234’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘जमलं हो जमलं’, ‘डोम’, ‘एक शोध’ ‘गोळा बेरीज’, ‘बॉम्बे वेलवेट’, ‘पोलीस लाईन’ अशा एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

त्याचबरोबरते उत्तम निर्माते देखील होते. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. 2007 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ थँक्यू विठ्ठला’ हा त्यांच्या निर्मिती मधला प्रथम चित्रपट होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली. त्यानंतर त्यांनी बॅक, 1234, मेनका उर्वशी, पोलीस लाईन एक पूर्ण सत्य या चित्रपटांच्या दमदार निर्मितीसाठी ते ओळखले जातात.

दिग्गज कलावंताच्या निधनानंतर राष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी देखील ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिला आहे की, ” मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.”

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *