प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्री दीपिकाला झाला हा आजार; आर्ध्या रात्री रुग्णालयात दाखल

मुंबई | बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या सौंदर्यासोबतच फिटनेससाठी ओळखली जातेय. तिच्यासारखं आपणही फिट राहावं असं तिच्या प्रत्येक चाहत्याला वाटत असणार. पण बॉलिवूडची हीच अभिनेत्री मध्यंतरी एका गंभीर आजाराचा सामना करत होती. हा आजार शारीरिक नाही तर मानसिक आजार होता. तिन या आजाराशी लढण्याचा तिचा प्रवास कसा होता याविषयी प्रथमच सांगितल आहे.

एका प्रसिद्ध चॅनलने घेतलेल्या मुलाखतीत, दीपिका म्हणाली की, 2015 या वर्षी मी एका गंभीर आजाराशी झूंज देत होते. या आजाराबाबत मला काडीमात्र कल्पना नव्हती. जर माझ्या आईने लक्षणे ओळखली नसती, तर मला या आजाराबाबत कळालंच नसत, असा धक्कादायक खुलासा तिन केलाय.
दीपिका पदुकोण ज्या आजाराबाबत बोलत होती. तो आजार मानसिक आजार होता. 2015 साली ती या डिप्रेशनचा सामना करत होती.

या आजाराबाबत मुलाखतीत बोलताना दीपिका पुढे म्हणाली की, “माझे आई-वडील बंगळुरूमध्ये राहतात आणि प्रत्येक वेळी ते मला भेटायला यायचे, तेव्हा मी नेहमीच खंबीर राहायचे, जसे सर्व काही ठीक आहे. पण एकदा ते बंगळुरूला परत जात असताना मी पुर्णत खचलेले. यानंतर आईन मला काही प्रश्न विचारले, यावेळी मला एकटेपणा जाणवत होता. त्यावेळी असे वाटले की देवाने त्यांना माझ्यासाठीच पाठवलय.

10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त आयोजित तिरुवल्लूर, तामिळनाडू येथून तिच्या मानसिक आरोग्य फाउंडेशनच्या ‘लिव्ह लव्ह लाईफ’ या कार्यक्रमामध्ये दीपिकाने मानसिक आरोग्याविषयी आणि त्याला कसे सामोरे जावे.

त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल सांगितले. ती पुढे म्हणते, ‘जेव्हा मी इतरांच्या कथा ऐकते तेव्हा मला कळते की काळजी घेणाऱ्याचे मानसिक आरोग्य हे आजारी व्यक्तीच्या मानसिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *